Kirit Somaiya
Kirit Somaiya Sarkarnama
कोकण

Kirit Somaiya At Kokan: किरीट सोमय्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला; कोर्लई गावात काय घडलं?

सरकारनामा ब्युरो

Konkan Korlai Village News: किरीट सोमय्यांनी कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या कथित १९ बंगल्यांच्या जागेची पाहणी करायला गेले होते. काही महिन्यांपुर्वी किरीट सोमय्यांनी कोर्लई गावात ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मालकीचे १९ बंगले असल्याचा आरोप केला आहे. मागच्या वेळी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन जागेची पाहणीही केली होती. त्यानंतर सोमवारी (१७ एप्रिल) ते कोर्लई गावात पुन्हा त्या बंगल्यांची पाहणी करायला गेले होते. पण गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सोमय्यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला. (Kirit Somaiyas had to retreat due to the aggression of the villagers of Korlai village)

किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) कोर्लई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ठाकरे कुटुंबियांच्या जमिनीची पाहणी करत होते. पण दुसरीकडे कोर्लई गावातील गावकरी मात्र सोमय्यांविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. गावातील काही महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. सोमय्यांनी केलेल्या तक्रारीनंतर कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सोमय्यांवरोधात प्रचंड रोष होता. सोमय्यांनी खोटे आरोप करत तक्रर केल्याचे आरोप प्रशांत मिसाळ यांनी केला. (Maharashtra Politics)

ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर सोमय्यांना जाब विचारण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. कोर्लई गावातील ठाकरे कुटुंबाच्या कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणी सोमय्यांनी केलेल्या आरोपामुळे प्रशांत मिसाळ यांना तुरुंगवारी करावी लागली होती. सोमय्यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी चौकशी सुरु झाली. पण गावकऱ्यांचा वाढत्या रोषामुळे सोमय्यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.

रश्मी उद्धव ठाकरे यांचे कोर्लई गावात 19 बंगले आहेत. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जमीन व्यवहाराची कागदपत्रे गहाळ करायला लावल्याचे आरोप किरीट सोमय्यांनी केले आहेत.रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील मुरूड कोर्लई येथील रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांच्या नावे साडेनऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने करीत आलेले आहेत.

रिपब्लिक इंडिया टीव्हीचे अर्नब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक केल्यानंतर कोर्लई जमीन खरेदी-विक्री व्यवहार किरीट सोमय्या यांनी उघड केला होता. सदर जमीन ही अन्वय नाईक यांच्या नावे होती.त्यांच्याकडूनच ही जमीन रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांच्या नावावर करताना राजकीय दबावाचा वापर करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी अलिबाग येथे आंदोलनही केले होते.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT