Ashish Shelar Vs Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Kokan Politics: ना ग्रामपंचायत सुद्धा जिंकण्याची वॉरंटी, म्हणून हवी जनतेला मोदीजींची गॅरंटी!

सरकारनामा ब्यूरो

Kokan News: उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्या दिवसाच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला लक्ष केले होते. यावरून ' मिळाला काय रायगडकरांचा कौल ? असा उपरोधिक सवाल शेलारांनी उपस्थित केला आहे. शेलारांनी 'एक्स'वरुन ठाकरेंना डिवचलं आहे.

पेण, रोहा, चौल...काय मिळाला रायगडकरांचा कौल? असा सवाल उपस्थित करीत शेलारांनी ठाकरे यांना ग्रामपंचायत सुद्धा जिंकण्याची वॉरंटी नाही, अशा शब्दात सुनावले आहे.

ना आपल्या हातात पक्ष.. ना पक्षाचे निशाण... ना कुठला अजेंडा.. ना हातात भगवा झेंडा.. मळमळ, जळजळ आणि भाजपा व्देष त्यामुळे ना ग्रामपंचायत सुध्दा जिंकण्याची वॉरंटी, म्हणून हवी जनतेला मोदीजींची गँरेंटी!! असा टोला त्यांनी ठाकरेंना हाणला आहे.

उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व काल सादर झालेल्या अर्थसंकल्पावरही जोरदार टीका केली होती. तसेच यावेळी त्यांनी मोदींची गॅरंटी यावरही टीका केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत अजित पवार यांना क्लीन चिट हीच मोदींची गॅरंटी अस म्हणत डिवचले होते.

याच मुद्द्यावरून आमदार आशीष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याअगोदर ठाकरे यांनी अभ्यास करण्याची सवय स्वतःला लावावी. उद्धव ठाकरे यांचे जिभेवरचे नियंत्रण सुटला आहे असे सांगत ही सगळी मंडळी उद्धव ठाकरेंबरोबर असताना धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असं म्हणणारे उद्धवजी ही मंडळी आज ठाकरे यांना सोडून दुसऱ्या विचारांच्या पक्षात गेले तर ते भ्रष्टाचारी झाले. उद्धव ठाकरे ज्यावेळेला स्वतः अजित दादांच्या मांडीला मांडी लावून बसले त्यावेळेला अजितदादा हे दुधासारखे स्वच्छ होते आज ते स्वतःच पक्ष घेऊन या सरकारमध्ये आले तर ते भ्रष्टाचार झाले अशा शब्दात एड. आशिष शेलार शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT