Konkan Heavy Rain sarkarnama
कोकण

Konkan Heavy Rain : कोकणात पावसाचा कहर! रायगड-रत्नागिरीला जोडणारा पूल बंद, मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याला मोठ्या भेगा

Mhapral Ambet bridge closure : राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून मुंबई, उपनगर, कोकण, पुणे ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दाणादाण उडाली असून कोकणात पावसाचा कहर सुरूच आहे.

Aslam Shanedivan

Ratnagiri News : राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर कायम असून मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच आता रत्नागिरी जिल्ह्यातून दोन महत्वाचा बातम्या समोर येत आहेत. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील महत्त्वाचा म्हाप्रळ-आंबेत पुल बंद करण्यात आला आहे. तर लांजा शहरातील उपशेट्येवाडी येथे समोर उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलावरील डांबरी रस्ताही एका ठिकाणी खचला आहे. यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झाला असून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेला सावित्री नदी वरील आंबेत पुलाला दोन बार्जसची धडक बसली आहे. हे दोन्ही बार्जस पावसाच्या पाण्यासोबत वाहत आले असून ते नदीत पूलाच्या मधोमध आडकले आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर पुढील आदेशापर्यंत ती बंद असेल.

महाड व परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग, वरंधा घाट पुणे मार्ग ताम्हीणी घाट पुणे मार्ग, आंबेनळी घाट मार्ग, महामार्गावरील कशेडी घाट असे सर्व प्रमुख रस्ते यापूर्वीच बंद झाले आहेत. यामुळे प्रवासी व नागरिक त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावरील लांज्यात उड्डाणपुलाच्या भारावाची भिंत ढासळली असून रस्त्याला देखील भेगा पडल्याचे समोर आले आहे. लांजा शहरातील उपशेट्येवाडी येथे समोर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या भारावाच्या भिंतीवरील सिमेंट काँक्रिट प्लेट ढासळल्या आहेत. यामुळे आता प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप आता होताना दिसत असून महामार्गाच्या निकृष्ट कामावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

तर भारावाच्या भिंतीवरील सिमेंट काँक्रिट प्लेट ढासळल्यानंतर आता ठेकेदार कंपनीकडून केवळ सिमेंट लावून मलमपट्टीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, ही तात्पुरती मलमपट्टी असून डांबरी रस्त्यालाही मोठ्या भेगा पडल्या आहेत. तसेच रस्ता खचल्याचे उघड झाले आहे. तर आता यामुळे जर एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल देखील स्थानिकांसह प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT