Lok Sabha Election 2024 Sarkarnama
कोकण

Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग हातून गेल्यानंतर सामंत बंधू नारायण राणेंच्या प्रचारात...

Chetan Zadpe

Ratnagiri News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीचा तिढा अखेर सुटला आहे. येथून भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. भाजप - शिवसेना युतीत परंपरागत ही जागा शिवसेनाच लढवत आली. आता मात्र ही जागा भाजपच्य खात्यात गेल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. अशातच आता नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत पोहोचलेले आहेत. (Latest Marathi News)

याबाबत किरण सामंत (KIran Samant) म्हणाले, "मी स्वत: स्पष्ट केले होतं की, मी माघार घेत आहे. आता मी आमच्या महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारात सक्रिय झालो आहे. जोरात प्रचार करून नारायण राणे यांना निवडून आणणार आहे." विधान परिषदेच्या आमदारकीच्या आश्वासनानंतर तुम्ही माघार घेतली का? असा प्र्श्न सामंत यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, "विधानसभेच्या आश्वासनावरती किंवा तशा अटीवरती मी माघार घेतलेली नाही. मी निवडणूक सोपी होण्याकरिता माघार घेतली आहे," असे स्पष्टीकरण किरण सामंत यांनी दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सामंत बंधूंची काढली समजूत -

महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांची समजूत काढण्यात युतीच्या नेत्यांना यश आल्यामुळे भाजप नेते नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. तसंच किरण सामंत आणि उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आपण युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT