महाड नगराध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
या निर्णयानंतर महायुतीतच थेट लढतीचे संकेत दिसू लागले आहेत.
स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Mahad News : नुकसाच राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत मुंबई पार पडली. यावेळी झालेल्या घोषणेत महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीही आरक्षण निघाले. यामुळे आता महायुतीसह महाविकास आघाडी आणि मनसे, शेकापसह स्थानिक आघाड्या कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. तर सध्याच्या घडीला मनसे आणि ठाकरेंची शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
राज्यातील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची घोषणा सोमवारी (ता.6) झाली. ज्यात महाडचे नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे समोर आले. यामुळे आता ते आपल्यालाच किंवा आपल्या आपल्या सहकाऱ्याला यासाठी पदाधिकारी मोर्चे बांधणीला लागले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माजी नगराध्यक्ष सुदेश कळमकर, शिवसेनेकडून माजी नगरसेवक नितीन पावले, तसेच माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून चेतन उर्फ बंटी पोटफोडे यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
सध्या रायगडमध्ये सुरू असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वादामुळे भाजपही यात भरला जात आहे. तर या दोन्ही पक्षांमध्ये युती होईल अशी शक्यताही क्षीण मानली जात आहे. अशा स्थितीत भाजपची भूमिका निर्णायक ठरू शकते. तसेच भाजप, शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या पदाधिकार्यांसह मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महाड नगर परिषदेची मागील सार्वत्रिक निवडणूक 2016 मध्ये झाली. त्यावेळी चुरशीने झालेल्या लढतीत तत्कालीन काँग्रेसमध्ये असलेल्या स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप कामत यांनी बाजी मारली. भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपिन म्हामुणकर यांच्या पत्नीला स्नेहल जगताप यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. तर त्यावेळी निर्णायक मते मनसेच्या उमेदवाराने घेतल्याचे निकालात स्पष्ट झाले होते. पण आता स्नेहल जगताप कामत या शिवसेना व्हाया राष्ट्रवादीत स्थिरावल्या असून त्यांनी भरत गोगावले यांच्याविरोधात विधानसभा लढली होती.
त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी जगताप कुटुंबीयांचा चेहरा नसल्याने, म्हामुणकर पुन्हा पत्नीला उमेदवारी देण्याबाबत खेळी करतील का? अशा चर्चा देखील आता रंगू लागल्या आहेत. त्यामुळे म्हामुणकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आता महाडचे नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आता इच्छुकांची संख्या वाढू शकते. तर मुख्य लढत राष्ट्रवादी व शिवसेनेत होण्याची शक्यता असून नेते मंडळीची डोकेदुखीही वाढणार आहे. तसेच कोण कोणाला शह-काटशह देतो, हे पाहणे आगामी काही दिवसांत उत्सुकतेचे ठरणार आहे.
प्र.1: महाड नगराध्यक्ष पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे?
👉 नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
प्र.2: या आरक्षणानंतर राजकीय परिस्थिती कशी आहे?
👉 महायुतीतच थेट संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.
प्र.3: महाड नगराध्यक्ष निवडणूक केव्हा होणार आहे?
👉 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसोबत होणार आहे.
प्र.4: महाड नगराध्यक्षपदासाठी कोणते पक्ष प्रमुख दावेदार असतील?
👉 भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात मुख्य लढत होऊ शकते.
प्र.5: आरक्षणामुळे कोणाला फायदा आणि तोटा होऊ शकतो?
👉 मागास प्रवर्गातील उमेदवारांना फायदा होणार असून अन्य उमेदवारांसाठी आव्हान निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.