Crime News Sarkarnama
कोकण

Crime News : 20 रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी गेली अन् तिची हत्या झाली,असा सापडाला आरोपी

Kalyan Crime News :कल्याण पूर्व अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या

Sudesh Mitkar

Kalyan  News : कल्याण पूर्वे येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काल एकाला ताब्यात घेतलं तर मुख्य आरोपी विशाल गवळी हा फरार झाला होता. आता पोलिसांना त्याला बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. 

कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने बुलढाणा येथील शेगाव येथून मुख्य आरोपी विशाल गवळी याला ताब्यात घेतलं आहे. आरोपी त्याच्या पत्नीच्या घरात लपून बसला होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळतच पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या घटनेनंतर कल्याण पूर्व भागातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून विशाल गवळी याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज कल्याण पूर्वेतील नागरिकांनी निषेध मोर्चा देखील काढला.

सोमवारी संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. अल्पवयीन मुलगी आईकडून 20 रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र ती घरी न परतल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला. खूप शोधून देखील काहीच तपास न लागल्याने मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. 

पोलिसाने गांभीर्य दाखवत तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 24 डिसेंबरला या मुलीचां मृतदेह कल्याण नजीक बापगाव परिसरात आढळला. याप्रकरणी झडा लावण्यासाठी कोळशेवाडी पोलिसांनी पथके तयार करण्यात होती. या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी काही तासांतच या प्रकरणातील दोन आरोपीची ओळख पटवली. त्यानुसार मृत मुलीच्या जवळच राहणारा विशाल गवळी आणि त्याची पत्नी या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 यापूर्वी विशाल गवळी यांच्या विरोधात चार विनयभंगाचे गुन्हे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. विशाल गवळी हा विकृत स्वभावाचा असून आतापर्यंत त्याची तीन लग्न झाली आहेत. तो सध्या तिसऱ्या बायकोबरोबर राहतो. पतीच्या दुष्कृत्यावर पडदा टाकण्यासाठी पत्नीने त्याला मुलीचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचे समोर आले आहे.  त्यामुळे त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते तसेच पोलिसांन कालपासूनच विशाल गवळीचा शोधत होते. अखेर बुलढाणा येथील शेगाव येथून त्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली रिक्षा देखील ताब्यात घेतली आहे. या रिक्षा चालकाचा गुन्ह्यात किती सहभाग आहे याबाबतची चौकशी सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT