Malvan Sting Operation; Nilesh Rane And Nitesh Rane sarkarnama
कोकण

Nitesh Rane : मालवणमध्ये ट्वीस्ट? नीलेश राणेंनी धडाकेबाज स्टिंग ऑपरेशन केलं; त्याच भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी भाऊ नितेश राणेंनी भेट दिली, क्लिनचिटचा प्रयत्न?

Malvan Sting Operation : ऐन हिवाळ्यात तळकोकणात नगरपालिका निवडणुकांमुळे वातावरण तापलेले असतानाच शिवसेनेचे नेते आमदार नीलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकून खळबळ उडवून दिली आहेत.

Aslam Shanedivan

  1. नीलेश राणेंनी मालवणमध्ये एका भाजप पदाधिकार्‍याच्या घरी स्टिंग ऑपरेशन करून पैशांनी भरलेली बॅग सापडल्याचा दावा केला.

  2. या आरोपानंतर राणे बंधूंच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून वातावरण अधिक तापले आहे.

  3. नितेश राणेंनी केनवडेकर यांच्या घरी भेट देत त्यांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे वाद आणखी तीव्र झाला.

Sindhudurg News : राज्यात नगरपालिका निवडणुकांमुळे वातावरण तापलेले असतानाच तळकोकणात शिवसेनेचे नेते आमदार नीलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरावर धाड टाकत स्टिंग ऑपरेशन केले. या वेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी, मालवण पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा घेतल्यानंतर मतदारांना वाटप करण्यासाठी पैशांच्या बॅगाच बॅगा रवींद्र चव्हाण यांनी उतरवल्याचा आरोप केला. या दाव्यानंतर जिल्ह्यासह राज्यात चर्चा रंगली असतानाच भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी थेट त्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी भेट दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणानंतर एकप्रकारे त्या पदाधिकाऱ्या क्लिनचिट देण्याचा प्रयत्न केला जातोय अशी चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात नगरपालिका निवडणुकांवरून महायुतीतच तणाव निर्माण झाला आहे. मालवण पालिकेच्या निवडणुकीतही असेच चित्र पाहायला मिळत असून येथे भाजप-शिवसेना आमने-सामने आले आहेत. अशातच निलेश राणे यांनी भाजपविरोधात आरोपांची राळ उडवून दिली आहे. यामुळे राणे बंधूंमध्येच वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच भाजपचे प्रचार सभेनंतर नवा वाद सुरू झाला आहे.

येथे रवींद्र चव्हाण यांनी प्रचार सभा घेतल्यानंतर निलेश राणे यांनी भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी तेथे पैशांनी भरलेली बॅगा सापडली. ज्यानंतर भाजपवर त्यांनी जोरदार प्रहार केला. तर भाजपने देखील यावर पलटवार करत हे आरोप खोटे असल्याचे सांगितले. तर रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री नितेश राणे यांनी देखील बोचरी टीका केली. नितेश राणे यांनी फक्त टीकाच केली नाही तर त्यांनी थेट केनवडेकर यांच्या घरी भेट दिली. यामुळे आता केनवडेकर यांना भाजपकडूनच क्लिनचिट देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उघड होत आहे.

यावेळी नितेश राणे यांनी, आम्ही सगळे राजकीय पक्षाचे सदस्य असून आमचे व्यवसायही आहेत. आम्ही राजकारण हे समाजकारण समजून करतो, पक्षाचे काम करतो. पण पोटापाण्यासाठी उद्योग व्यवसाय हा करावा लागतो. तसेच केनवडेकरांचे आहे. ते देखील समाजकारणासाठीच राजकारणात आहेत. त्यांचेही बाजारपेठेत स्वत:चे दुकान आहे, व्यवसाय आहे. घरात जे पैसे सापडे ते त्यांच्या व्यवसायाचे पैसे असतील तर त्यात चुकीचे काय आहे? असा सवाल त्यांनी थेट आपल्या बंधुंनाच विचारला आहे.

तर पैसे आढळून आल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून याची चौकशी पोलिस करतायेत. आम्ही यात हस्तक्षेप करणार नाही. तसे कोणी करूही नये. केनवडेकर यांच्याकडून अशी कृती होणार नाही. भाजपला अशा पद्धतीने निवडणूक लढविण्याची काही गरज नाही. आमच्याकडे मोदी, फडणवीस यांचे नेतृत्व असताना आम्हाला असे करण्याची गरजच काय? आम्ही विकासावर बोलतोय, त्यावरच मते मागतोय. तर आता जी पैसांच्या बॅग सापडली त्यावर निवडणूक आयोग आणि पोलीस चौकशीत उलगडा होईल, असे नितेश राणे म्हणाले.

आम्हाला याची गरजच नाही

निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांनी येथील निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना वाटण्यासाठीच पैसे आणले होते, असा आरोप केला होता. यावर बोलताना, निलेश राणे यांनी, केनवडीकर हे व्यवसायिक आहेत. त्यांची प्रोफाईल पाहिली तरी सगळ्यांना याची उत्तरे मिळतील. हमाम मे सब नंगे होते हैं... चौकशी पारदर्शक होईल. त्यानंतर सगळं समोर येईल. तर याची आम्हाला गरज नसून लाडकी बहीण, शेतकरी सन्मान या योजनांचे लाभार्थी भरपूर आहेत. त्यांना दुसरं काही द्यायचीच गरज नाही, असा टोलाच नितेश राणे यांनी बंधू निलेश राणे यांना लगावलाय.

FAQs :

1) प्रश्न: स्टिंग ऑपरेशन कोणी केले?
उत्तर: हे स्टिंग ऑपरेशन आमदार नीलेश राणे यांनी केले.

2) प्रश्न: नेमके काय मिळाले?
उत्तर: पैशांनी भरलेली बॅग सापडल्याचा दावा करण्यात आला.

3) प्रश्न: भाजप पदाधिकारी कोण?
उत्तर: विजय केनवडेकर हे संबंधित भाजप पदाधिकारी आहेत.

4) प्रश्न: नितेश राणेंनी काय केले?
उत्तर: त्यांनी केनवडेकर यांच्या घरी भेट देत त्यांना क्लिनचिट दिल्याचा आभास निर्माण झाला.

5) प्रश्न: यामुळे काय राजकीय परिणाम झाले?
उत्तर: राणे बंधूंमध्ये संघर्ष तीव्र झाला आणि मालवणची निवडणूक अधिकच तापली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT