CM Udhav Thackeray sarkarnama
कोकण

ठाकरेंना समर्थन देणाऱ्या शहरप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी ; ऑडियो क्लिप व्हायरल

Shivsena |"आपली नेतागिरी माथेरानमध्येच कर, कर्जत मध्ये दिसू नकोस, दिसल्यास ठार मारु"

सरकारनामा ब्युरो

माथेरान : शिवसेनेत (shivsena) उभी फूट पडल्यानंतर आता दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक युद्ध सुरु झाले आहे. समर्थन देण्यावरुन दोन्ही गटातील काही कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होत आहे. दररोज दोन्ही गटातून आरोप-प्रत्योरोप सुरु आहेत. अशातच माथेरानच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. (Shivsena latest news)

माथेरान शिवसेना शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रसाद सावंत (prasad Sawant) यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. प्रसाद सावंत हे उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख आहेत. "आपली नेतागिरी माथेरानमध्येच कर, कर्जत मध्ये दिसू नकोस, दिसल्यास ठार मारु" अशी धमकी सावंत यांना देण्यात आली आहे.

रविवारी सावंत यांना फोनवरून ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी सावंत यांनी माथेरान पोलीस (Matheran Police) ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय. या पूर्वीही उद्धव ठाकरेंना समर्थन दिल्याने त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

धमकी देणारा हिंदी भाषेत बोलत होता. या धमकीची ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. सावंत यांच्यावर मागील महिन्यात कर्जतमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातील आठ आरोपी अजूनही मोकाट असतानाच त्यांना हा धमकीचा फोन आला आहे.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर माथेरानचे शिवसेना नेते प्रसाद सावंत हे उद्धव ठाकरेंच्या गटात राहिले आहेत. कर्जतचे बंडखोर शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचा फोटोही त्यांनी माथेरानच्या शिवसेना शाखेतून काढला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रसाद सावंत हे कर्जतला गेलेले असताना अज्ञातांनी रस्त्यात अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला होता. यातून सावंत वाचले

जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेले प्रसाद सावंत हे सध्या माथेरानमधील घरी बेडरेस्टवर आहेत. रविवारी 31 जुलै रोजी त्यांना एका नंबरवरून फोन आला. "मागच्या वेळी फक्त मारहाण करून सोडलं. पण यावेळी जीवे मारू," अशी थेट धमकी फोनवरुन एका व्यक्तीने दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT