Uday Samant, Sanjay Raut News Sarkarnama
कोकण

Uday Samant News : संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या फोटोवर उदय सामंत स्पष्टच बोलले; म्हणाले...

Shashikant Warise News : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Konkan News : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटातील नेते मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचा एक फोटो ट्वीट केला होता. त्यावरुन आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

''उदय सामंत म्हणाले ''राऊतांनी जो फोटो ट्वीट केला आहे तो जुना आहे. फोटो नाकारण्याचे काही कारण नाही. कारण मी मंत्री होऊन रत्नागिरीला गेलो होतो. अनेक लोक आजूबाजूला येऊन फोटो काढतात. तसाच तोही एक फोटो होता. फोटो काढला याचा अर्थ मी त्याला पाठबळ दिले असा त्याचा अर्थ होत नाही. कारण त्या व्यक्तीचे अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत. महाराष्ट्राच्या जनतेनेही ते पाहिलेले आहेत. जो कोणी नेता त्याच्यासोबत आहे, तो यामध्ये सामील आहे, असे राजकारण करणे योग्य नाही, असे मला वाटते, अशी भूमिका सामंत यांनी मांडली.

संजय राऊत यांनी पत्रकाराच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्या मागणीचे मी पूर्ण समर्थन करतो. माझी, माझ्या नातेवाईकांची त्या ठिकाणी एक इंचही जमीन असेल तर मी राजकारण सोडायला तयार, असल्याचेही सामंत यांनी म्हटले आहे. मात्र, जमीन नसेल तर ज्यांनी तसे आरोप केले आहे, त्यांनी राजकारण सोडायला हवे, असे आव्हानही सामंत यांनी दिले.

दरम्यान, संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये काय म्हणाले होते, ''व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता. पत्रकार शशिकांत वारिशे यांचा खून राजकीय आहे. नाणार परिसरात नेत्यांनी मोठ्या प्रमाणात बेनामी जमीन खरेदी केली आहे. त्या सर्व सावकार आणि जमीनदारांनी मिळून शशिकांत यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली. शशिकांतचा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT