Bharat Gogawale Sarkarnama
कोकण

Maharashtra Cabinet Expansion: 100 नाही 101 टक्का मी मंत्री होणार; आमदार भरत गोगावलेंनी थोपटले दंड

सरकारनामा ब्यूरो

Political News: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार हालचाली सध्या सुरु आहेत. या विस्तारामध्ये शिवसेनेतील (शिंदे गट) अनेक आमदारांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. यातच महाडचे आमदार भरत गोगावले हे देखील मंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत. असं असलं तरी मंत्रिमंडळ विस्तारात कुणा-कुणाची वर्णी लागते? कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं द्यायचं, यासंदर्भातील तिढा अद्याप सुटलेला नाही.

खाते वाटपाचा तिढा सोडवण्याच्या पार्श्वभूमीवर सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता आमदार भरत गोगावले यांनी मात्र, मंत्रिपद आणि रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी दंड थोपटले आहेत. तसेच आपण 100 टक्के नाही तर 101 टक्के मंत्री होणार, असा दावाच भरत गोगावले यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

भरत गोगावले नेमकं काय म्हणाले?

मंत्रिपदाची खात्री आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना भरत गोगावले म्हणाले, "मंत्रिपदाची खात्री कालपर्यंत 100 टक्के होती. आता ही खात्री 101 टक्का झाली आहे. आमचा नंबरच पहिला लागलेला होता. काही कारणास्व मी थांबलो होतो. आता पुढे काय थांबण्याची आवश्यकता वाटत नाही. अजित पवार हे सरकारबरोबर येणार येत होते म्हणून आम्हाला लेट होतं होतं", असं म्हणत भरत गोगावले यांनी मंत्रिपद आणि पालकमंत्रीपदासाठी थेट दंड थोपटले आहेत.

दरम्यान, खाते वाटपासाठी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्वाची बैठकही पार पडली. पण या बैठकीत देखील खाते वाटपासंदर्भात कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे राज्यातील काही दिग्गज नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाते वाटपाचा तिढा भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते कसा सोडवतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT