Yogesh Kadam
Yogesh Kadam Sarkarnama
कोकण

आमदार योगेश कदमांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी; कोकणातून संधी मिळणार?

सरकारनामा ब्यूरो

खेड (जि. रत्नागिरी) : राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार (Cabinet expansion) होणार आहे, असे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केले असून शिंदे गटाचे प्रतोद आणि महाड-पोलादपूरचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्यासह आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. (MLA Yogesh Kadam's ministerial lottery?)

सध्या मंत्रीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २० मंत्री आहेत. त्यात भारतीय जनता पक्षाचे नऊ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे ९ मंत्री असून विस्ताराच्या दुसऱ्या टप्यात भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी चार आमदार यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या वेळी राज्यमंत्रीपदे भरण्यात येणार आहेत.

शिंदे गट आणि भाजप यामधील इच्छुकांनी त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणाचा समावेश होणार याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटात अनेक आमदार इच्छुक आहेत. पहिल्या विस्ताराच्या वेळी शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांचे नाव ऐनवेळी कट झाले होते. यावेळी त्यांना निश्चित संधी मिळेल, असे बोलले जात आहे.

कोकणातून माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि दापोलीचे आमदार योगेश कदम यांनाही मंत्रीपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात कोकणला दोन मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

दरम्यान, योगेश कदम यांचे वडील माजी मंत्री रामदास कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा किल्ला जोरदारपणे लढवत आहेत. त्यांनी थेट मातोश्रीलाच अंगावर घेतले आहे. त्यामुळे कदम यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT