Raj Thackeray News Sarkarnama
कोकण

Raj Thackeray News राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; बाळासाहेबांच्या नावावर मुंबईचा महापौर बंगला ढापला...

Mns Raj Thackeray News : राज ठाकरे यांनी कोकणातील रत्नागिरीमध्ये जाहीर सभा झाली

सरकारनामा ब्यूरो

Raj Thackeray Ratnagiri News : तुम्हाला हवा होता म्हणून तुम्ही मुंबईचा महापौर बंगला बाळासाहेबांच्या नावावर ढापला. तेव्हा लोकांची भावना विचारली होती का? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला.

राज ठाकरे यांनी कोकणातील रत्नागिरीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरादर टीका केली. तसेच मुंबईच्या महापौर बंगल्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार आहे. त्यावरुन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला.

तुम्हाला तो बंगला हवा होता म्हणून बाळासाहेबांच्या नावावर ढापला, असा हल्लाबोल त्यांनी केला. शिवसेनेचे (Shivsena) आमदार काय खासदार काय? एक म्हणतो पाठिंबा देणार, दुसरा म्हणतो पाठिंबा देणार नाही. पक्ष म्हणून काही भूमिका आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला. फक्त राजकारण सुरु आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज बारसूमध्ये येवून गेले. आता काय सांगतात हे जी लोकांनची भावा असेल ती आमची भावना आहे. तर मग आता तुमच्या भावनेला कोण विचारते. आजपर्यंत फक्त हे फसवत आले आहेत ही माणस. तयारीने विचार करा, या गोष्टींचा असेही राज ठाकरे म्हणाले. ही सगळी लोक तुमच्या कोकणाची धुळधाण करतील, फक्त माझा कोकण वाचवा हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे.

ज्या गोष्टी कोकणामध्ये आहेत, त्या गोष्टीवर एक केरळ राज्य सुरु आहे. हे प्रकल्प कधी गोव्याला जात नाहीत, केरळला जात नाहीत, हे फक्त येतात महाराष्ट्रातच. कोकणाचा विकास केला तर फक्त कोकण महाराष्ट्राला पोसेल असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच कोणताली रस्त्याचे काम १७ वर्षांपासून सुरु आहेत. त्याकडे सरकारचे लक्ष नाही, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT