Gajanan Kirtikar, Uddhav Thackeray
Gajanan Kirtikar, Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Gajanan Kirtikar : गजानन किर्तीकरांची जहरी टीका; उद्धव ठाकरे हेच गद्दार : त्यांनी शिवसेना संपवली

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा खेडमध्ये होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाल आहे. त्यामुळे खेडमध्ये आज एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात याबद्दल उत्सुकता आहे.

दोन आठवड्यांपूर्वीच ५ मार्चला उद्धव ठाकरेंनी खेडमधील गोळीबार मैदानावर सभा घेतली होती. त्या सभेला आजच्या सभेमधून शिंदे उत्तर देणार आहेत. दरम्यान, या सभेपूर्वी शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते व खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जरही टीका केली.

माध्यमांशी बोलतना गजानन किर्तीकर म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी संपवली आहे. गद्दारच जर म्हणायचे असेल, तर उद्धव ठाकरे यांना म्हटले पाहिजे. आज कोण आहे त्यांच्यासोबत? ज्यांनी आयुष्यात त्यांना घेरले, त्यांच्याकडून वेगवेगळे लाभ घेतले, त्यांना आता उद्धव ठाकरेंची तळी उचलून धरावी लागत, असल्याचा हल्लाबोल कीर्तीकर यांनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये पोहचले आहेत. गोळीबार मैदानावर थोच्याच वेळात सभा होणार आहे. या सभेसाठी शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. कोकणातील मतदार नियमीत शिवसेनेच्या मागे उभा राहिला आहे. त्यामुळे या सभेच्या माध्यमातून कोकणात शक्तीप्रदर्शन करण्याचा शिंदे यांच्या शिवसेनाचा प्रयत्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT