Madhur Mhatre Sarkarnama
कोकण

Madhur Mhatre Disqualification Hearing : KDMC राजकारणात खळबळ! शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकाच्या अपात्रतेवर उद्या सुनावणी

State Government hear disqualification petition against KDMC corporator Madhur Mhatre amid growing political interest Kalyan-Dombivli : एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोपावरून, नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्याविरोधातील याचिकेवर राज्य सरकारसमोर निर्णायक सुनावणी होत आहे.

Pradeep Pendhare

KDMC Political News : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत असून नगरसेवक मधुर उमेश म्हात्रे यांच्या अपात्रतेच्या याचिकेवर राज्य सरकारकडून सोमवारी (1 जून) सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, 1986 अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली असून, या सुनावणीकडे संपूर्ण कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे (ShivsenaUBT) कल्याण-डोंबिवली महापालिकेतील गटनेते उमेश धोंडू बोरगांवकर यांनी जिल्हाप्रमुख शरद शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे.

याचिकेनुसार, मधुर म्हात्रे हे प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडून आले होते. मात्र, 16 मार्च 2026 रोजी त्यांनी मूळ पक्षाला कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, महापालिकेच्या महासभांमध्ये ते मूळ पक्षाच्या आसनव्यवस्थेऐवजी दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांसोबत बसत असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, 1986 च्या कलम 3(1)(अ) अंतर्गत त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणी यापूर्वी 25 मे रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय कारणांमुळे सुनावणीची वेळ आणि ठिकाणात बदल करण्यात आला. त्यानुसार आता ही सुनावणी सोमवारी मुंबईतील जुने सचिवालय येथे होणार आहे.

सुनावणीसाठी नगरसेवक मधुर म्हात्रे, याचिकाकर्ते उमेश बोरगांवकर आणि शरद पाटील यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सुनावणीनंतर राज्य सरकार कोणता निर्णय घेते, यावर केवळ मधुर म्हात्रे यांचे राजकीय भवितव्यच नव्हे, तर कल्याण-डोंबिवलीतील स्थानिक राजकारणाची आगामी दिशा देखील अवलंबून राहणार असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT