Narayan Rane news सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरेंच्या सोबत आता राहिलंय कोण? ती सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांना माझ्या विरोधात बोलायला इथे आणलं. नारायण राणेंविरोधात बोलायला शिवसेनेत आता राहिलंय कोण? तिला माझ्यावर टीका करायला इथे आणलं, याचा अर्थ शिवसेना संपली ना, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी टिका केली आहे.
दोन दिवसांपुर्वी ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा सिंधुदुर्गात होती. या दौऱ्यात अंधारे यांनी राणे पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला. अंधारे यांचे वार राणेंच्या जिव्हारी लागल्याने राणे यांनीही पत्रकार परिषद घेत अंधारे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टिका केली. तर आदित्य ठाकरे यांनाही इशारा दिला.
शिवसेनेत उभी फूट पडतीये, याचा आनंद आहे. माझ्या विरोधात बोलायला आता शिवसेनेत कुणीच राहिलं नाही, म्हणून ती सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांना माझ्या विरोधात बोलायला इथे आणलंय ना, अशी टिका राणे यांनी केली. त्याचवेळी, अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणात आम्ही आदित्यला सोडणार नाही, त्या प्रकरणातलं सगळं वास्तव आम्हाला माहिती आहे, अशी धमकीच राणेंनी आदित्य ठाकरेंना दिली.
शिवसेनेचं दुसरं पिल्लू आहे ते कुठल्याही बिळात शिरतंय. बिहारला जातो काय? कोणालाही मिठी मारतो काय.... का मिठ्या मारतो त्यालाच कळत नाही आणि त्याने कितीही मिठ्या मारल्या तरी सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणात तो सुटणार नाही. कारण आम्हाला वास्तव माहिती आहे. आम्ही त्याला सोडणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला.
काँग्रेस इतके वर्ष सत्तेत होती. काय केलं काँग्रेसने? आतापर्यंत किती भारत जोडला काँग्रेसने? काय केलं सांगावं त्यांनी. यात्रा संपली की राहुल गांधी जातील इटलीला.. असं म्हणत राणेंनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचीही खिल्ली उडवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.