Ashok Kharat 1 Sarkarnama
कोकण

Ashok Kharat : शपथविधी की बुवांचा जमाव? शहा, फडणवीस, शिंदे अडचणीत? शेतकरी नेत्याने अशोक खरात प्रकरणावरून टाकला राजकीय बॉम्ब!

Farmer leader Raju Shetti demands investigation into alleged links between fake godman Ashok Kharat and top leaders including Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, and Deepak Kesarkar in Sindhudurg : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला बुवा जास्त होते! शहा, फडणवीस, शिंदे, केसरकर सर्वच चौकशीच्या फेऱ्यात; शेतकरी नेत्याच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra political controversy : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांनी राज्यातील अनेक राजकीय नेत्यांची अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांविरोधात या प्रकरणावरून आरोपांची धार तीव्र केली आहे.

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या चौकशीची मागणी केली आहे. राजू शेट्टी यांच्या या मागणीमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले, "अशा बुबांचं सरकारी पातळीवर खूप उदो-उदो सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला देखील अनेस अनेक बुवा बसलेले होते. माणसानं धार्मिक असावं. परंतु अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणारे, माणसाच्या धार्मिक भावनेचा गैरफायदा घेऊन, अतिशय किळसवाण्यापद्धतीने, महिलांचं लैगिंक शोषण करणारे, हे बुवा आहेत, त्यांच्या मागे असणारे राजकीय नेते आहेत, प्रशासनातील दिग्गज अधिकारी आहेत, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे."

"200 कोटींची मालमत्ता यांच्याकडे येतेच कुठे? पाय काय धुणून पितात, काय-काय करता हे सर्व आम्ही पाहात आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र (Maharashtra) आहे. हा महाराष्ट्र आता नेमका कुठे घेऊन चालले आहेत," असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.

रूपाली चाकणकरांचा राजीनामा घेऊन चालणार नाही, जे राजकीय नेते, मग सत्तेतील असो की विरोधतील, या बुवाच्या नादाला लागलेत, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. हजारो महिलांचे शोषण इथं झालेलं आहे, असा खळबळजनक दावा राजू शेट्टी यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राझ्यांच्या पाटलाची शिरछेद केला होता. त्याने एका महिलेचा अपमान केला होता. तो हा महाराष्ट्र आहे, हे विसरू नका, असाही सूचक इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

शहा, फडणवीस अन् शिंदेंनी खुलासा करावा

या भोंदूबाबाबरोबर दीपक केसरकर नाही, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो समाज माध्यमांवर बघितले आहेत. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. मी या सर्वांवा आवाहन करतो की, या सर्वांनी समोर येऊन खुलासा केला पाहिजे, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले.

शेट्टी यांचे जनतेला आवाहन

राजू शेट्टी यांनी जनतेला आवाहन करताना, आपल्या आया-बहि‍णींच्या अब्रुची काही किंमत आहे की नाही, या नेत्यांची चौकशी झाली नाहीतर, त्यांनी त्याचा जाब विचारला पाहिजे. किती दिवस तोंड बंद करून हे सहन करायचं. विचार करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT