Raigad Politics; ncp leader sudhakar ghare sarkarnama
कोकण

Raigad Politics : लेकाला आमदार करताना सुनील तटकरेंकडून निकवर्तीयचा राजकीय बळी? सुधारक घारे वेगळा निर्णय घेणार?

Shivsena UBT expansion in Raigad : कोकण विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर आता तटकरेंकडून निकवर्तीयचा राजकीय बळी दिला जात असल्याची टीका होताना दिसत आहे.

Aslam Shanedivan

Raigad News : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी सोमवारी (ता. १) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची एकत्र उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जतमधील नेते सुधाकर घारे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांची उपस्थिती राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेत राहिली.

यापूर्वी आमदार थोरवे यांनी सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्यावर अनेकदा उघडपणे जहरी टीका केली आहे. मंगेश काळोखे हत्या प्रकरणीही त्यांनी गंभीर आरोप करीत सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

काही प्रसंगी त्यांनी तटकरे यांची तुलना 'रायगडचा औरंगजेब' अशीही केली होती. या पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी आमदार महेंद्र थोरवे उपस्थित राहिल्याने रायगडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

याचवेळी व्यासपीठावर थोरवे यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी सुधाकर घारे हेही उपस्थित होते. त्यामुळे भविष्यात कर्जत खालापूरमध्ये राजकीय संघर्षाऐवजी समन्वयाचे नवे पर्व सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यातील जवळीक भविष्यात कर्जत खालापूरच्या स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम करू शकते.

आतापर्यंत थोरवेंविरोधी भूमिका हीच घारे यांच्या राजकीय बळाची प्रमुख आधारशिला राहिली आहे. मात्र महायुतीतील बदलत्या समीकरणांमुळे स्थानिक राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, सुधाकर घारे यांनी २०२९ची विधानसभा निवडणूक लढवणारच असे जाहीर केले असून, ही समन्वयाची नांदी सुधाकर घारे यांच्यासाठी वेगळा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू शकते. त्यामुळे घारे आगामी काळात मशाल हातात घेणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT