नितेश राणे यांनी दावा केला आहे की रोहित पवार शरीराने शरद पवारांसोबत असले तरी मनाने भाजपसोबत आहेत.
रोहित पवार भाजपाच्या काही मंत्र्यांशी संपर्कात असल्याचाही गौप्यस्फोट नितेश राणेंनी केला आहे.
या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलं आहे.
Sindhudurg News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ज्यात त्यांनी भाजपसह मनसे आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला. त्यांनी भाजपने मनसेला ट्रॅप केलं आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय निकाल देईल, यामुळे ते आप आपला पक्ष भाजपमध्ये विलिन करतील असा दावा केला होता. यानंतर आता राज्यात खळबळ उडाली असून यावर भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रतिक्रिया येताना दिसत आहे. यावेळी भाजप नेते तथा राज्याचे बंदर व मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार करताना, तेच आमच्या पक्षाच्या नेते आणि मंत्र्यांच्या संपर्कात आहे. ते सध्या शरीरानं शरद पवारांसोबत, पण मनाने भाजपसोबत असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Nitesh Rane Claims Rohit Pawar Is Mentally with BJP While Physically in NCP SP Political Circles Stirred)
रोहित पवारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत दावा केला होता. त्याचवेळी त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत 3 गट पडल्याचंही सांगितलं होते. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात या दाव्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या दाव्यावरून नितेश राणे यांना पत्रकारांनी छेडलं होते. यावर नितेश राणे यांनी रोहित पवारांबाबत मोठा दावा केला.
नितेश राणे यांनी रोहित पवार भाजपसोबत जातील. ते 2019 मध्येच भाजपमध्ये जाणार होते. ते भाजप नेत्यांना कधी कधी भेटतात. भाजपमधील कोणकोणत्या मंत्र्यांच्या ते संपर्कात आहेत, हे देखील एकदा बघा. सध्या जरी ते शरीरानं शरद पवार यांच्यासोबत असले तरी पण मनाने ते भाजपसोबत आहेत, असाही दावा नितेश राणेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला आहे.
राष्ट्रवादीत 2 नाही तर, 3 गट पडले आहेत. त्यांचे कोकणातील नेतेच स्वत: ला बॉस समजतात, असं सुनील तटकरेंचं नाव न घेत अप्रत्यक्ष निशाणा रोहित पवार यांनी साधला होता. हा निशाना त्यांनी, 'तटकरेंवर पत्ते उधळल्यानंतर झालेल्या मारहानीवरून साधला. तर अजितदादांवर आरोप झाल्यास पक्षातील किती नेते त्यांची बाजू घेतात?, असाही सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी घेतलेल्या भेटीवरही भाष्य केले. त्यांनी, ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर कोणाला वाईट वाटण्याची गरज नाही. पण राज साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला. ते उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला गेले. पण राज ठाकरेंच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे गेले होते का? राज साहेबांना मातोश्रीतून कायमस्वरूपी काढण्यासाठी ज्या उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केले. आज त्याच उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच स्वागत करावं लागत आहे. यालाच एखाद्याची अधोगती म्हणतात, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
1. नितेश राणे यांनी रोहित पवारांबाबत नेमकं काय म्हटलं?
– त्यांनी म्हटलं की रोहित पवार शरीराने शरद पवारांसोबत आहेत, पण मनाने भाजपसोबत आहेत.
2. रोहित पवार भाजपच्या संपर्कात आहेत का?
– नितेश राणे यांचा असा दावा आहे की ते भाजप नेते व मंत्र्यांच्या संपर्कात आहेत.
3. यावर राष्ट्रवादी पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे का?
– सध्या तरी राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
4. या वक्तव्याचा परिणाम काय होऊ शकतो?
– राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता असून अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे.
5. हे वक्तव्य निवडणुकीपूर्वी करण्यात आले आहे का?
– होय, स्थानिक आणि संभाव्य विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.