भाजप आमदार नीतेश राणे यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून वाद पेटण्याची चिन्हे आहेत. मालेगाव येथे एका वर्षात 300 कोटी रुपयांच्या विजेची चोरी होते. हा सगळा पैसा दहशतवाद लव्ह जिहाद, लँड जिहाद अशा हिंदूविरोधी कारवायांसाठी वापरला जातो, असा आरोप भाजपचे युवा नेते आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. या सगळ्याची माहिती आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे नीतेश राणे म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
शिंदे गटाचे मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे मालेगाव बाह्यचे आमदारही आहेत. यामुळे नीतेश राणे यांच्या या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपण्याची चिन्हे आहेत. नीतेश राणेंनी Uddhav Thackeray यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ठाकरे यांना लूकआउट नोटीस देऊन त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
नाशिक जिल्ह्यात मालेगाव येथे होणारी वीजचोरीची रक्कम वसूल करण्यासाठी पोलिस व महावितरणच्या अधिकाऱ्यांचीही हिंमत होत नाही. अधिकारी वसुलीसाठी जातात त्यावेळेला तेथील मोहल्ल्यांमधून हल्ला केला जातो, असा आरोप नीतेश राणेंनी केला आहे. ही सगळी माहिती आम्ही फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दिली आहे, असे ते म्हणाले.
मालेगाव येथे पोलिस आयुक्तालय उभे करण्याची मागणी आपण केली आहे. यासाठी फडणवीससाहेब यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे. अन्य मुस्लिम देशातही इतकी गंभीर परिस्थिती नाही, एवढी भीषण स्थिती मालेगावात आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये बदल होईल. या सगळ्याची गंभीर दखल गृहमंत्र्यांनी घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
खासदार संजय राऊतही ईडीच्या कारवाईत थोड्या दिवसांत आर्थर रोड तुरुंगात खिचडी खाताना दिसतील. सोरेन यांच्यासारखे उद्धव ठाकरेही देशाबाहेर पळून जाऊ शकतात, असा आरोप त्यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीसमोर हार चढवला होता. टिपू सुलतानची वाहवा करीत टिपू सुलतान याला ते हिरो म्हणतात. आता हे प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांना चालतात का? आता ठाकरेंचे हिंदुत्व कुठे गेलं? असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
आमचे महापुरुष छत्रपती शिवराय व धर्मवीर संभाजीराजे यांच्यावरील चित्रपटाला अडथळा आणणारा सेन्सॉर बोर्डात असलेला जिहादी अधिकारी आता नजरेत आला आहे. त्याची वळवळ कशी ठेचायची, हे आम्हाला आमच्या धर्माने शिकवला आहे. त्याची वळवळ थांबवू, असाही इशारा त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक ग्रामपंचायत सदस्यसुद्धा निवडून येणार नाही. 2014 व 2019 च्या निवडणुकीत मोदीसाहेबांच्या नावाने तुमचे खासदार निवडून आले. आता 2024 च्या निवडणुकीत तुमची लायकी दिसण्याची वेळ आली. त्यावेळेला तुम्हाला आता वेगवेगळे फॉर्म्युले दिसले, अशी टीका नीतेश राणेंनी केली.
edited by sachin fulpagare
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.