nitesh rane sarkarnama
कोकण

नितेश राणेंची अटक अटळ? आज सुनावणी

न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता नितेश राणेंवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर भाजपा (bjp)आमदार नितेश राणे (nitesh rane) अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात नाव आल्याने नितेश राणे यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. ही अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता नितेश राणेंवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना कणकवलीत नुकतीच मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे. चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेण्यात आलं असल्याची माहिती आहे. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप आमदार नितेश राणे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. भाजपचे आमदार नितेश राणे यांनीच हा हल्ला केल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता.

“दुचाकीवर असताना मला जोरात एका गाडीने धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की त्यामुळे मी रस्त्याच्या बाजूने फरफटत गेलो. माझ्या हाताला जखमही झाली आहे. फरफटत जाऊन मी एका बाजूला पडलो होतो आणि माझी दुचाकी माझ्या पायावर होती. ती एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा होती. पुढे जाऊन २०-२५ फुटांवर जाऊन थांबली. त्यातील एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि जाताना गोट्या सावंत, नितेश राणे यांना कळवलं पाहिजे असं म्हणत खिशातून मोबाईल काढला,” असं संतोष परब यांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT