Nitesh Rane Sarkarnama
कोकण

Nitesh Rane : 'काशी व मथुरेसाठी पुन्हा एकदा 'कारसेवा' हाक येईल तेव्हा...' ; नितेश राणेंचं मोठं विधान!

सरकारनामा ब्यूरो

Sindhudurg news : अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभं राहिलं आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. देशात राम उत्सव साजरा होतोय हा आजचा दिवस आपल्याला कारसेवकांमुळे पाहायला मिळाला आहे. त्यांनी बलिदान दिलं नसतं व हिंमत दाखवली नसती तर आजचा दिवस आपल्याला अनुभवायला मिळाला नसता. आजवर कोणत्याही सरकारला जे जमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि इच्छाशक्ती काय असते हेही यातून दाखवून दिलं.' असे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी सोमवारी काढले.

याशिवाय कारसेवकांनी दाखवलेली हिंमत आत्मसात करा आपल्याला भविष्यात पुन्हा एकदा काशी व मथुरा यासाठी कारसेवा करायची संधी निश्चितपणे मिळेल, असं मोठे वक्तव्य आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी कणकवली येथे केलं आहे.

तसेच अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या मंदिरासंदर्भात ठाकरे गटातील काही कपाळकरंटे या सगळ्यावर टीका करायला पुढे आले होते. असं म्हणत उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्यावरही नितेश राणे टीका केली. तर मंदिर वही बनायेंगे और मंदिर भव्य बनायेंगे या दोन्ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करून दाखवल्या असे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्या येथे प्रभू श्री रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कारसेवकांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार,संघाचे जिल्हा कार्यवाह लहू म्हाडेश्वर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सावंत,प्रकाश गोगटे, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी 'प्रवाहाच्या विरोधात जावून हिंदू समाजासाठी,धर्मासाठी केलेली कामगिरी फार मोठी असते.आज जो सत्कार केला तो कारसेवकांचा कार्याचा आणि गुणांचा आहे. प्रभू श्रीराम म्हणजे एक ऊर्जा आहे. त्यांना पाहून ऊर्जा मिळते. अशोक सिंगल, लालकृष्ण आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे अशा अनेक नेत्यांनी यासाठी पुढाकार घेतला त्यांचा सुद्धा या यशात सिंहाचा वाटा आहे.' असा उल्लेख आमदार नितेश राणे यांनी केला.

याशिवाय 'राम मंदिर राजकीय इच्छा असती तर या पूर्वी केले असते मात्र ती नव्हती. जेव्हा भाजपची सत्ता आली आणि मोदी पंतप्रधान झाले तेव्हा मंदिर वही बनायेंगे आणि भव्य मंदिर बानायेंगे असे जाहीर करून मोदींनी ते उभारून दाखविले. मात्र काँग्रेसची सत्ता असताना रामजन्म भूमीवर प्रश्न निर्माण केला होता. वक्फ बोर्ड जी भूमिका घेते तीच भूमिका आता उध्दव ठाकरे घेत आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर साठी जे केले ते सर्व उध्दव ठाकरे यांनी घालविले आहे.' अशी टीकाही राणेंंनी केली.

तसेच, 'आक्रमणे आजही सुरू आहेत मात्र त्याचे स्वरूप वेगळे आहे. त्यामळे हिंदूराष्ट्र म्हणून सुरक्षित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. हिंदू म्हणून आपल्याला नरेंद्र मोदी यांचीच सत्ता हवी हे लक्षात ठेवा आणि हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकजुट ठेवा.' असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.

उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका -

दरम्यान आमदार नितेश राणे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यावरती जहरी टीका केली आहे. 'वडिलांसारखी केवळ वस्त्र घालून वारसा सांगता येत नाही, वडिलांसारखे नेतृत्त्व, कर्तृत्त्व, विचारधारा जपायची असते, नव्हे तर ती आणखी पुढे न्यायची असते. मध्येच यूटर्न घेतला नसता तर अयोध्येत दर्शनापासून तोंड लपवायची पाळी आज आली नसती... जय श्रीराम' अशा स्वरूपाची पोस्ट नितेश राणे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून करत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT