Nitesh Rane  Sarkarnama
कोकण

Nitesh Rane News : 'मुंबईतील रोहिंगे, बांगलादेशींची अतिक्रमणं हटवा, अन्यथा..' ; नितशे राणेंचा इशारा

Encroachment in Mumbai : मुंबई आता हिंदूंची मुंबईत राहिली आहे का? असा सवालही केला

सरकारनामा ब्यूरो

Sindhudurg News : आपली मुंबई आता हिंदूंची मुंबई राहिली आहे का? असा सवाल करत बाहेरून आलेले रोहिंगे, बांगलादेशी मुसलमानांनी अतिक्रमण केल आहे असा आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

आम्ही या अतिक्रणाची माहिती त्या अधिकाऱ्यांनीही देणार आहोत पण ही अनधिकृत अतिक्रमण जर का हटवली नाहीत, तर आम्ही आमच्या पद्धतीने त्या त्या ठिकाणी जाऊन महाआरती करण्यास सुरुवात करू. असा इशारा नितेश राणे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

अनधिकृत मशीद असेल मदरसा असतील अनधिकृत पद्धतीने जमिनी बळकावणे सुरू आहे. अतिक्रमणं जर का वेळेत तोडली नाहीत, जर कारवाई केली नाही. तर आम्ही ही सगळी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊ आणि मग तिथे ज्या पद्धतीने मीरारोडवर बुलडोझर चालला कोल्हापूरला बुलडोझर चालला त्याच पद्धतीने बुलडोझर चालेल. ही सगळी अनधिकृत अतिक्रमण काढली नाहीत तर आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन महाआरती करण्याची सुरुवात आम्ही करणार आहोत. असाही इशारा त्यांनी दिला आहे.

महाआरती करणाऱ्या हिंदू समाजाला ताकद देणार आहोत. आमच्या तासंतास महाआरत्या चालणार. असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. आपण ज्या शहरांमध्ये राहतो त्या शहरात तिथे राहणाऱ्या आपल्या हिंदूंची लोकसंख्या किती आहे आणि या बाहेरून आलेल्या बांगलादेशी रोहिंगे मुसलमान जे आपलेच नाहीत. त्यांची संख्या किती आहे हे तपासावे. आपल्या मुंबईला सीरिया बनवण्याच्या नादामध्ये ही सगळी त्यांची नाटकं तमाशे चालू आहेत. असा आरोपही नितेश राणेंनी केला आहे.

अशी अतिक्रमण वाढायला लागली तर वक्फ बोर्डच्या नावाने असो लँड जिहादच्या नावाने असो तुम्ही आणि आम्ही काहीच करू शकणार नाही अशी ही भीती राणे यांनी व्यक्त केली. 1992 -93 च्या दंगलीनंतर मुंबई वाचवली अशी एक भावना सगळ्यांमध्ये निर्माण झाली आणि या सगळ्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व त्या वेळच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आपण देतो.

एक धक्का मारला अयोध्येत राम मंदिर तयार झालं. अजून दोन धक्के मारायचे बाकी आहेत मुंबईतील या मोहल्यांमध्ये अनधिकृत बांधकाम काढून टाका. महानगरपालिका अधिकाऱ्यांची यादी आमच्याकडे आहे. नाहीतर मीरा रोड प्रमाणे बुलडोझर चालणार लँड जिहादच्या नावाने जे काही चालू आहे ते वेळेत बंद करा. सकाळची कडक झोप लागली असेल तेव्हा बुलडोझर चालतील लक्षात ठेवा. असा थेट इशाराच आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT