गुहागर : शिवसेना पक्षातील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता नव्याने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी शिवसेनेतील नेते महाराष्ट्र दौऱ्यावर जात आहेत. त्यातच शिवसेना नेते भास्कर जाधवही आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी शनिवार गुहागर येथील शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
याचवळी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महत्त्वाची विधाने केली आहेत. येत्या काळात भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात दंगली घडवू शकते, असं सूचक विधान त्यांनी केली आहे. सध्या संपूर्ण देशाची राजकीय परिस्थिती बघितली तर लक्षात येईल की, ज्या-ज्या राज्यात भाजपाची सत्ता आली, त्या-त्या राज्यात निवडणुकांपूर्वी जातीय दंगली घडल्या आहेत किंवा जातीय दंगली घडवल्या गेल्या आहेत. हा भाजपचा इतिहास आहे.
महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचे सर्व मार्ग संपले आहेत.म्हणून आता महापालिका निवडणुकांपूर्वी शेवटचा मार्ग म्हणून राज्यात कदाचित महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. जातीय दंगलीचा हा प्रयत्न पूर्वी अडीच वर्षांमध्ये झाला आहे. कारण आता भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे. मुंबई महापालिका जिंकायची असेल, तर राज्यात जातीय दंगली घडवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिला नाही, हे त्यांना आता कळून चुकलं आहे.”
राज्यातील मुस्लीम समाजासह सगळ्या जाती-धर्मातील लोकांना उद्धव ठाकरेंचं अतिशय सौम्य आणि सभ्य नेतृत्व भावलेलं आहे. नेही उद्धव ठाकरेंचं नेतृत्व भावलं आहे. हेच भाजपचं दु:ख आहे. त्यांनी शिवसेना पक्ष फोडला पण फक्त चाळीस आमदार फोडू शकले. पण चाळीस आमदारांच्या बदल्यात आज प्रत्येक ठिकाणी चार लाख लोकं शिवसेनेच्या मागे उभी आहेत. हे चित्र आज महाराष्ट्र पाहत आहे, त्यामुळे आता भाजप राज्यात जातीय दंगलीचा असा काहीतरी उद्योग करू शकते” असं भास्कर जाधवांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.