Rane Family

 

Sarkarnama 

कोकण

सिंधुदुर्गात चार नगरपंचायतीच्या निवडणुका : तीनही राणेंची प्रतिष्ठा पणाला

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे मतदारसंघात तळ ठोकून

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील देवगड जामसंडे, वाभवे-वैभववाडी, कुडाळ व कसई- दोडामार्ग या चार नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. नारायण राणे (Narayan Rane) हे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची राजकीय परीक्षा होत आहे. त्यामुळे खुद्द नारायण राणे यांच्यसाह आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) हे येथे तळ ठोकून आहेत. या राणेंच्या ताकदीला आव्हान देण्यासाठी शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), आमदार वैभव नाईक, (Vaibhav Naik), दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे मैदानात उतरले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत निर्णय दिल्यानंतर नगरपंचायतीच्या ओबीसी आरक्षित जागांवरील निवडणूक रद्द झाली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नगरपंचायतीमधील ओबीसी आरक्षित प्रत्येकी 4 जागा वगळता उर्वरित जागांसाठी ही निवडणूक होत आहे. उद्या सर्व ठिकाणी 13 जागांसाठी निवडणूक होत आहे. येथे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचीही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरणात राजकीय रंगत आली आहे. मात्र अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनही सर्वोतपरी काळजी घेत आहे.

देवगड जामसंडे नगरपंचायत साठी 40 उमेदवार, वैभववाडी- वाभवे साठी 37 , कुडाळ नगरपंचायतसाठी 41 तर कसई दोडामार्ग साठी 36 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चारही नगर पंचायत मध्ये एकूण 28575 मतदार मतदान करणार आहेत.

काँग्रेस या निवडणुकीत स्वबळावर लढत असल्याने खरी लढत ही भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडी अशीच रंगणार आहे. आरोप- प्रत्यारोपांमुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनविल्या आहेत. मात्र, मतदारराजा कोणाच्या बाजूने कौल देणार, याचा निकाल १९ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या मतमोजणीतूनच स्पष्ट होईल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही काही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर काही जागांवर बंडखोर अपक्षांचेही आव्हान राजकीय पक्षांना पेलावे लागणार आहे. असे असले तरी ही निवडणूक खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच रंगणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चारही नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT