Aniket Tatkare, Sunil Tatkare, Mahendra Thorve Sarkarnama
कोकण

Sunil Tatkare vs Mahendra Thorve : वडिलांची औरंगजेबाशी तुलना लेकाच्या जिव्हारी, शिंदेंच्या आमदाराचा व्हिडिओच बाहेर काढला

Sunil Tatkare vs Mahendra Thorve dispute : बहुचर्चित छावा सिनेमातील औरंगजेबाचा दाखल देत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरेंना औरंगजेबाची उपमा दिली होती. 'आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय'; अशा शब्दात त्यांनी तटकरेंवर टीका केली होती.

Jagdish Patil

Raigad News, 06 Feb : बहुचर्चित छावा सिनेमातील औरंगजेबाचा दाखल देत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरेंना औरंगजेबाची उपमा दिली होती. 'आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय'; अशा शब्दात त्यांनी तटकरेंवर टीका केली होती.

थोरवेंचं हे वक्तव्य सुनिल तटकरेंच्या लेकाच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे. त्यामुळे आता अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी थोरवेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अनिकेत यांनी महेंद्र थोरवेंनी गद्दारी केल्याचा आरोप करत त्याबाबतचा पुरावे देखील व्हिडिओ दाखवले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

तर राजकारण करायला गेलात तर तुम्हाला क्षणिक सुख मिळेल. पण पुढील काळात वाईट परिणाम भोगावे लागतील, असं म्हणत त्यांनी तटकरेंना इशाराच दिला आहे. शिवाय महेंद्र थोरवे ही गद्दारीचे पिलावळ असून सुनील तटकरे (Sunil Tatkare) राजकारणात 40 वर्षापासून कार्यरत आहेत. ते जनतेसाठी अहोरात्र काम करतात.

त्यामुळे थोरवे जर का वल्गना करत असतील तर त्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ. विधानसभा निवडणुकीच्या काळात थोरवेंनी आमच्यासोबत गद्दारी केल्याचं सांगत त्यांनी आघाडीच्या नेत्यांबरोबरचे थोरवेंचे व्हिडिओ देखील दाखवले. त्यामुळे रायगडच्या (Raigad) पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुरू झालेला वाद काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं दिसत आहे.

नेमकं प्रकरण काय?

अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेट सामन्यात पालकमंत्रिपदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो, असा टोला शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना लगावला होता. तटकरेंच्या याच वक्तव्याचा संदर्भ घेत महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला होता.

थोरवे म्हणाले, पंचांचा निर्णय अंतिम असतो. या सामन्यात तुम्ही कप्तान होत असताना सर्व मिळायला हवं असं चालणार नाही. क्रिकेटची उदाहरणे आम्हाला देऊ नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. याचवेळी बोलताना त्यांनी तटकरेंची तुलना थेट औरंगजेबाशी केली. छावा चित्रपटाचे उदाहरण देत 'आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय' असं वक्तव्य थोरवे यांनी केले होते. त्यावरून आता नव्या वादाला सुरूवात झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT