Raigad Zilla Parishad : भाजपचा अध्यक्ष असलेल्या रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचा स्वीय सहाय्यकाला दीड लाखांचा लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड पथकाने ही कारवाई केली. या मोठ्या कारवाईमुळे रायगडच्या राजकारणासह खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेतील (ZP) शिक्षकांच्या बदल्यांची कारवाई सुरू आहे. यासाठी ही लाच मागितल्याचा आरोप आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या स्वीय सहाय्यकाने थेट दीड लाखांची लाच घेतल्याने, रायगड जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार असे संकेत मिळू लागले आहे.
योगेश भस्मे हा जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात वित्त लेखा सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. तो अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचा स्वीय सहाय्यक (PA) म्हणून काम पाहत होता. प्राथमिक माहितीनुसार, त्याने साधारणपणे दीड लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून, लाच स्वीकारताना रायगडच्या (Raigad) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्याला रंगेहाथ पकडले.
योगेश भस्मे याला पथकाने ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदवण्याची कारवाई सायंकाळीपर्यंत सुरू होती. योगेश भस्मे याला कायदेशीरपद्धतीने उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पथकाने पुढील तपासासाठी पोलिस कोठडी मागण्याची तयारी केली आहे.
योगेश भस्मे हा जिल्हा परिषदेचे भाजपचे अध्यक्षाचे स्वीय सहाय्यक असल्याने, तपासाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचणार, याची चर्चा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर रंगली आहे. दरम्यान, विरोधकांना या प्रकारामुळे आरोपांसाठी आयते हत्यार मिळाले आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये लाच घेतल्याने, या प्रकरणावरून जिल्हा परिषदेच्या राजकारणात राजकीय आरोपांचा धुरळा कसा उडतो, हे पाहण्याची आता उत्सुकता असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.