Raj Thackeray Sarkarnama
कोकण

भाजपची जवळीक नडली? राज ठाकरेंच्या खंद्या समर्थकाची पक्षातून हकालपट्टी; इतर दोघांच्या हकालपट्टीचेही राज ठाकरेंचे आदेश

Raj Thackeray expels Vaibhav Khedekar : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तळ कोकणात मोठी कारवाई करत कोकणातील एकमेव नेते खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह तिघांवर बडतर्फीची कारवाई केली आहे. खेडेकर भाजपात जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान ही कारवाई झाली आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. राज ठाकरे यांनी खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ४ जणांना मनसेतून बडतर्फ केले आहे.

  2. खेडेकर भाजपात जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.

  3. वैभव खेडेकर २०१४ मध्ये दापोली विधानसभा निवडणूक लढले होते मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

Ratnagiri News : सध्या राज्यात आगामी स्थानिकच्या निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला वेग येत असतानाच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे कार्यकर्त्यांची मोट बांधत असतानाच कोकणात त्यांनी मोठी कारवाई केली आहे. पक्षाचे तळ कोकणातील एकमेव नेते असणाऱ्या नेत्यासह तिघांवर कारवाई केली आहे. यामुळे रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. खेडेकर हे गेल्या काही महिन्यापासून पक्षावर नाराज होते. या करावाईमुळे आगामी स्थानिकमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

तळ कोकणात मनसेचे खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मनसे वाढवली होती. दरम्यानच्या काळात ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उत आले होते. तसेच भाजपबरोबर जवळीक वाढली होती. या कारणाने त्यांच्यासह तिघांवर बडतर्फीची कारवाई केली आहे. यामुळे तळ कोकणासह रत्नागिरीत मोठी खळबळ उडाली असून खेडेकर आता शिंदेंच्या शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

खेडेकर हे गेल्या काही महिन्यापासून पक्षावर नाराज होते. मध्यंतरी त्यांचा स्टेटसही चांगलाच व्हायरल झाला होता. तर याचवेळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चांना उत आला होता. खेडेकर यांच्या मनसेला सोडचिट्ठी अशा चर्चा सुरू होत्या. पण त्यावेळी त्यांनी आपण राज ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र आता पक्षानेच त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे. या कारवाईमुळे तळ कोकणात मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

तळ कोकणातील मनसेचे महत्वाचे शिलेदार म्हणून वैभव खेडेकर यांच्याकडे पाहिले जाते. ते गेल्या 20 वर्षांपासून मनसेबरोबर आहेत. पक्षाच्या योगदानात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दापोली मतदारसंघातून मनसेने तिकीट दिले होते. पण त्यांचा पराभव झाला होता. पण खेड नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर तेथे सत्ता आणण्यात खेडेकर यांचा महत्वाचा वाटा होता. ते खेडचे नगराध्यक्षही राहिले आहेत, ज्यामुळे त्यांचा स्थानिक प्रभाव वाढला.

कदमांशी संघर्ष

खेड आणि दापोली परिसरात हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात खेडेकर यांनी कदमांशी दीर्घकाळ संघर्ष केला. दरम्यान दापोलीतील एका कार्यक्रमात रामदास कदम यांच्याकडून या संघर्षाला मूठमाती देण्यारे वक्तव्य समोर आले होते. यामुळेच खेडेकर शिवसेनेच्या वाटेवर असणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. खेडेकर हे मनसेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक होते. पण आता पक्षानेच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याने मनसेला कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

FAQs :

प्रश्न 1: वैभव खेडेकर कोण आहेत?
उत्तर: वैभव खेडेकर हे खेडचे माजी नगराध्यक्ष असून मनसे स्थापनेपासून पक्षात कार्यरत होते.

प्रश्न 2: मनसेने त्यांना का बडतर्फ केले?
उत्तर: पक्षविरोधी कारवाया व भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे राज ठाकरे यांनी कारवाई केली.

प्रश्न 3: खेडेकरांनी कोणत्या निवडणुकीत भाग घेतला होता?
उत्तर: २०१४ मध्ये दापोली विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT