Rajan Salvi ACB Inquiry  
कोकण

Rajan Salvi ACB Inquiry : साडेचार तासांच्या चौकशीनंतर राजन सावळी म्हणाले...

बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी साळवी यांना नोटीस बजावण्यात आली होती.

सरकारनामा ब्युरो

Rajan Salvi ACB Inquiry : उद्धव ठाकरे गटाकडे राजन साळवी यांची अलिबागच्या लाचलुचपत विभागाने तब्बल साडेचार तास आज चौकशी करण्यात केली. बाहेर आल्यानंतर ते म्हणाले की, एसीबीने मला हजर राहायला सांगितले होते. पण इथे आल्यानंतर मला खूप आनंद झाला. कारण मी इथे आलो तेव्हा रायगडमधले शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, जनता इथे उपस्थित होते. त्यांनी शिवसेना या शब्दांशी त्यांचंं काय नात आहे. हे त्यांनी आज दाखवून दिलं, अशा शब्दांत राजन साळवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

एसीबीच्या कार्यालयातून साळवी बाहेर आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत शक्ती प्रदर्शन केलं. राजन साळवी यांना ‘अँटी करप्शन ब्युरो’ने (Anti Corruption Bureau) चौकशीसाठी बोलवलं आहे. बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी साळवी यांना नोटीस बजावण्यात आली होती. 

राजन साळवी सकाळी साडे अकरा वाजताच चौकशीसाठी अलिबागच्या कार्यालयात हजर झाले होते. '' माझ्या सारख्या सर्व सामान्य शिवसैनिकाकडे मोठे घबाड असल्याचे सरकारला वाटत आहे. पण आपल्यावर झालेली कारवाई चुकीची असून हे सर्व भाजपचं (BJP) षडयंत्र असल्याची टीका साळवी यांनी केली आहे. पण त्यांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. सरकारच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस देण्यात आली आहे. मी या चौकशीला सामोरे जाणार आहे. आज अलिबाग येथे लाच लुचपत कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे त्यांनी म्हटलं होतं.

इतकेच नव्हे तर भाजप आणि शिंदे गटात जो-जो पक्षप्रवेश करतो, तो स्वच्छ होतो. पण जो त्यांच्याकडे जात नाही. त्यांच्यावर ईडी, एसीबी यासारख्या तपासयंत्रणांच्या चौकशा लावल्या जातात, अशा शब्दांत त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. पण शिवसेना हे माझं कुटुंब आहे. या कुटुंबात माझे भाऊ, मुलं आहेत. रत्नागिरीत शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही नवी नाती जोडली. पण त्यांनी ज्या पद्धतीने माझ्यासारख्या शिवसैनिकाला नोटीस बजावल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच, त्याचा राग प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आहे,” असा सूचक इशाराही साळवी यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT