Rajan Salvi News : uddhav Thackeray
Rajan Salvi News : uddhav Thackeray  Sarkarnama
कोकण

Rajan Salvi News : ठाकरेंचे आमदार साळवींच्या कुटुंबियांना एसीबीची नोटीस : 'कुणालाच घाबरणार नाही..'

सरकारनामा ब्यूरो

Kokan News : शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते व आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या कुटुंबियांविरोधात एसीबीने नोटीस पाठवली आहे. राजन साळवी यांच्या पत्नी, मोठे बंधू आणि वहिणी यांना एसीबीच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. यांची आता २० मार्च रोजी चौकशी करण्यात येणार आहे. मागील दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घराची पाहणी देखील एसीबीकडून करण्यात आली होती.

राजन साळवी म्हणाले, "आज सकाळी माझ्या पत्नीला एसीबीची नोटीस आली. कुटुंबातल्या तिन्ही सदस्यांना नोटीस आलेली आहे. ही दुर्देवी बाब आहे. मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने मी आमदार झालो. राजन साळवी काय आहे, हे माझ्या मतदारसंघाला माहिती आहे. मी कोणाला घाबरणारा नाही. चौकशीला सहकार्य करणार आहे."

"पहिली नोटीस वैभव नाईकला आली, दुसरी नोटीस मला आली आणि तिसरी नोटीस नितीन देशमुख यांना आली. भाजपच्या लोकांना नोटीस येत नाही. फक्त भाजपमध्ये गेले तर वॉशिंग मशिनमध्ये स्वच्छ होतात. आम्ही मात्र दोषी, सरकारकडेच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. सत्ताधीश आहेत, सर्व यंत्रणा त्यांच्याकडे आहेत त्याचा वापर सुरू आहे. मात्र येणाऱ्या काळात जनता यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही," असे साळवी म्हणाले.

दरम्यान, राजन साळवी एसीबीच्या रडावर आहेत. एसीबीने दिलेल्या नोटीसीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी साळवींच्या घराचं नुकतंच मूल्यांकन केलं आहे. घराचं मूल्यांकन करताना त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. त्यांना अश्रू रोखता आले नव्हते. यानंतर आता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT