Ramdas Athawale Sarkarnama
कोकण

VIDEO : Ramdas Athawale - 'या' दोघांचे का होतात राडे?, याचे मला पडले आहे कोडे ; आठवलेंनी काढला चिमटा!

Mayur Ratnaparkhe

Ramdas Athawale on Rane and the Thackeray group : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे, तर सत्ताधारीही विरोधकांवर आरोप करत प्रत्युत्तर देत आहेत.

याच दरम्यान पुतळा पडला त्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे नेते पोहचले तेव्हा नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांसोबत त्यांचा चांगलाच वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेवर आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खाल शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.

सिंधुदुर्गामध्ये पत्रकारपरिषदेत बोलताना रामदास आठवले(Ramdas Athawale) म्हणाले, 'राणेंचा गट आणि ठाकरेंचा गट यांच्यामधील राडा हा पहिला राडा नाही. त्यांचे राडे अनेकवेळा झालेले आहेत आणि या दोघांचे का होतात राडे, याचे मला पडलेले आहे कोडे?'

तसेच 'वास्तिवक तिथे त्यांच्यामध्ये राडा व्हायला नको होता. पोलिसांनी सुद्धा एका एका गटाला तिथे सोडायला हवं होतं. दोन्ही गट त्या ठिकाणी गेले, सगळ्यांना तिथे जाण्याचा अधिकार आहेच. पण एका एकाने जर तिथे गेले असते तर हा कदाचित राडा झाला नसता. पोलिसांनीच एका गटाला आधीच अडवायला हवं होतं. एकाचवेळी सगळे तिथे गेले आणि त्या ठिकाणी जो प्रकार घडला तो योग्य नाही.' असंही आठवले म्हणाले.

याशिवाय 'असं होवू नये, कारण आता उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे सातत्याने आरोप करत आहेत. खोक्यांचे आरोप करत आहेत, अनेक आरोप करत आहेत. मिंधे म्हणून त्यांच्यावर आरोप करत आहेत. मी माझ्या राजकीय जीवनात अशाप्रकारचे आरोप-प्रत्यारोप पहिल्यांदाच पाहतो आहे. एवढे आरोप-प्रत्यारोप करून चालणार नाही.' अशा शब्दांत आठवलेंनी इशारा दिला.

एवढंच नाहीतर 'पूर्वीचं राजकारण हे नीतीमत्तेवर आधारित होतं. मी मंत्री असताना विरोधकांचा आदर करण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांची असायची आणि सत्ताधाऱ्यांची आजही भूमिका ही विरोधकांचा आदर करणारी आहे. पण विरोधकच एवढे बेफाम झाले आहेत की त्यांना सत्ता न मिळाल्यामुळे ते तडफडत आहेत आणि म्हणून सातत्याने सरकारवर आरोप करत आहेत.' अशा शब्दांत रामदास आठवले यांनी विरोधकांवर निशाणाही साधला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT