Ramdas Kadam : Yogesh Kadam Khed :
Ramdas Kadam : Yogesh Kadam Khed :  Sarkarnama
कोकण

Ramdas Kadam : मरगळलेली नाही, तर सच्च्या शिवसैनिकांची जिवंत सभा असेल; आमदार कदमांचं ठाकरेंना आव्हान..

सरकारनामा ब्यूरो

Kokan News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची उद्या खेड येथे होम ग्राऊंडवर सभा होत आहे. गोळीबार मैदानातील कदमांच्या सभेला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत. उद्या होणऱ्या या सभेची तयारी कशाप्रकारे होत आहे याची पाहणी रामदास कदमांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनी केली.

यावेळी योगेश कदम म्हणाले, "कोकणातील गोळीबार मैदान येथे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नेते रामदास कदम यांच्या प्रचारानिमित्ताने प्रचंड मोठी सभा झाली होती. तेवढीच मोठी सभा होणार आहे. सच्चा शिवसैनिक या सभेला येणार आहे. नाचत गाजत उद्या, शिवसैनिक सभेला येणार आहे. परवासाऱखी मरगळलेली सभा नसेल, जिवंत सभा असेल एवढंच मी सांगतो."

"पाच जिल्ह्यांमधून लोकं आणून, काय साध्य केलं? रामदास भाईंनी सांगितलं की, अशा शंभर सभा केल्य़ा तरी, योगेश कदमला पाडू शकत नाही, " असेही योगश कदम म्हणाले. यामुळे आता खेडच्या स्थानिक पातळीवर ही शिंदे गटा आणि ठाकरे गट असा सामना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ५ मार्च रोजी खेडमध्ये माजी आमदार संजय कदम यांच्या प्रवेशानिमित्त सभा पार पडली होती. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात गेलेले माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या होम ग्राउंडवर ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. यालाच उत्तर म्हणून कदमांकडून आता उत्तरसभा घेण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT