रामदास कदम यांनी सावली बार प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
त्यांनी भास्कर जाधव यांच्यावरही टीका करत विधानसभा निवडणुकीत आपल्या फक्त तीन सभा झाल्या असत्या तरी ते हरले असते असा दावा केला.
या वक्तव्यामुळे कोकण आणि राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
Ratnagiri News : आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिसह गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारवरील आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलं आहे. अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी केलेल्या आरोपांची धग अद्याप कमी झालेली नाही. यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम आरोप करताना दिसत आहे. आताही त्यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर निशाना साधत टीका केली. तसेच एकमेव आमदार भास्कर जाधव यांच्यावर देखील हल्लाबोल करताना विधानसभा निवडणूकीमध्ये भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात माझ्या सभा लागल्या नाहीत, हेच त्यांचे नशिब समजा. फक्त तीन सभा जरी झाम्या झाल्या असत्या तर भास्कर जाधव पडले असते असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे राज्यासह कोकणात उलट सुलट चर्चांना उधान आले आहे. (Bhaskar Jadhav would have lost if my rallies had happened, claims Ramdas Kadam)
यावेळी रामदास कदम म्हणाले, माझ्या जास्त नाही पण तीन जरी सभा गुहागर मतदारसंघात झाल्या असत्या तर भास्कर जाधवांना जड गेले असते. तो 20 हजार मतांनी उलटा पडला असता. मात्र आमच्या एका माणसाला हे काम दिलं होतं. पण तो माझी सभा लावायसाठी हालला नाही. असो आता त्यांचे नाव सांगून भावकीत कंदाल नको, असे म्हणत त्यांनी नाव घेणं टाळलं. त्यामुळे आता तो व्यक्त कोण याचीच चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
गुहागर मतदार संघातील अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे तीस ते पस्तीस हजाराचे मतदान आपल्याकडे फिरल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. तर आता मतदान पाहून विकासकाम करणाऱ्या भास्कर जाधवांकडे माणसेच कामे घेऊन जात नसल्याने त्यांना आता काही काम राहिले नाहीत असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला आहे.
दरम्यान जिल्ह्यात योगेश कदम यांच्या कामाचा धडाका सुरू असून ते विकासाचे राजकारण करत आहेत. पण त्यांचे हे काम बघून काही लोकांना पोटशूळ उठल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे. तसेच योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अनिल परब यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. कांदिवलीमध्ये सावली बार रेडवरून टीका करताना रामदास कदम म्हणाले, तो अर्धवट वकील असून फक्त योगेश कदम यांचे नाव खराब करण्याचे राजकारण सुरू आहे. त्यांच्या या प्रकरणाशी संबंध नसतानाही खोट्या माहितीच्या आधारे अधिवेशनात प्रश्न विचारण्यात आले आहेत, असा दावाही रामदास कदम यांनी केला आहे.
1. रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर नेमकं काय म्हटलं आहे?
त्यांनी दावा केला की जर त्यांच्या फक्त तीन सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव निवडणुकीत हरले असते.
2. सावली बार प्रकरणाचा या राजकीय वादाशी काय संबंध आहे?
सावली बारवर झालेल्या कारवाईनंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. अनिल परब यांच्या विधानामुळे कदम कुटुंब आणि शिवसेना उद्धव गटात वाद निर्माण झाला.
3. या वादाचा कोकणातील राजकारणावर काय परिणाम होतोय?
कोकणात राजकीय वातावरण चांगलंच तापले असून स्थानिक निवडणुकीपूर्वी ही चर्चा अधिक तीव्र होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.