Ramdas Kadam sarkarnama
कोकण

Ramdas Kadam Targets Uddhav Thackeray : 'मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेतील जुन्या नेत्यांना संपवलं...', रामदास कदमांकडून ठाकरे टार्गेट

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri : उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्यात महायुती सरकारसह शिंदे गटातील नेत्यांचा खरपूस समाचार घेत आहेत. त्यांच्या निशाण्यावर शिंदे गटातील रामदास कदम सातत्याने आहेत. आपल्या प्रत्येक भाषणात ते रामदास कदमांवर कडाडून हल्ला चढवत आहेत. मात्र आता उद्धव ठाकरे यांना रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Ramdas Kadam Targets Uddhav Thackeray )

'ज्या नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb-thackeray) यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, भगव्याला अधिक चमक दिली. त्या सगळ्याच जुन्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी स्वतःला मुख्यमंत्री होता यावं म्हणून संपवलं, अशी जहरी टीका रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे झालेल्या कार्यक्रमात कदम यांनी ठाकरेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले.

'काँग्रेस सोबत जाण्याची मला वेळ आली तर तर मी माझं शिवसेना नावाचे दुकान बंद करून टाकीन, अशी शपथ शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी घेतली होती. आता हे उद्धव ठाकरे सोनिया गांधी बरोबर गेले आहेत. शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसत आहेत आणि इतरांना गद्दार म्हणत आहेत. अरे तुमची औकात काय?', असा थेट सवाल कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपासला

एकनाथ शिंदे यांना आदल्या दिवशी मुख्यमंत्री पदाचा आमचा उमेदवार म्हणून जाहीर करून टाकलं. आणि एका रात्रीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खुपसून तू काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्री होतोस. मुख्यमंत्री काय शिवसेनाप्रमुखांना कधी होता आले नसतं का? ज्या मनोहर जोशींना बाळासाहेबांनी लोकसभेचा अध्यक्ष केलं त्या शिवसेनाप्रमुखांना लोकसभेचे अध्यक्ष होता आलं नसतं का? पण या उद्धव ठाकरेंना सत्ता हवी, मुख्यमंत्रीपद हवे म्हणून पक्ष संपवला असा आरोप कदम यांनी केला.

...तर राजकारणात निवृत्त होईल

प्रमोद नवलकरांचे फोनही हा माणूस घेत नव्हता. नवलकर यांच्या मुलीला जाऊन विचारून बघा. मी राजकारणातून उद्या निवृत्ती घेईन, असं थेट आव्हानच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं. ज्या वेळेला नवलकर साहेब गेले त्यावेळेला नवलकर साहेबांच्या मुलींनी चालते व्हा म्हणून उद्धव ठाकरे यांना सांगितलं. आता कशाला इथे आलात, असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी जाहीर सभेत केला.या सभेला दापोली तालुक्यात पालगड येथे आयोजित या सभेत व्यासपीठावर आमदार योगेश कदम तालुकाप्रमुख उमेश राजे, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रदीप सुर्वे, महिला आघाडीच्या दीप्ती निखार्गे, चारुता कामतेकर आदी उपस्थित होते

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT