ratnagiri Airport Sarkarnama
कोकण

चिपीनंतर रत्नागिरी विमानतळाचा मार्ग मोकळा

जागेचा प्रश्नही सुटला, तर विमानांच्या नाईट लॅंडिगसाठीही ७० कोटींचा प्रस्ताव

सरकारनामा ब्युरो

रत्नागिरी : सिंधूदुर्गातील (Sindhudurg) चिपी विमानतळाप्रमाणे (Chipi Airpoort) आता रत्नागिरी विमानतळही (Ratnagiri Airport) उड्डणासाठी तयार झाले आहे. रत्नागिरी विमानतळावर विमान पार्किंगसाठी जागा उपलब्ध नव्हती. मात्र आता धरम चव्हाण यांची ५० एकर जागा विमान लँडिंगसाठी भाड्याने मिळाली आहे. ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल. विमानांच्या नाईट लॅंडिगसाठीही ७० कोटीचा प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलताना ते म्हणाले की, ज्या कंपनीने चिपी विमानतळाचे काम केले आहे, तीच कंपनी रत्नागिरी विमानतळाचे काम करत आहे. विमानतळासाठी ५० एकर जागा लागणार होती; मात्र ती जागाच मिळत नव्हती. धरम चव्हाण यांनी दिलेल्या ५० एकर जागा विकसित करुन त्या जागेवर विमान पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी चव्हाण यांना योग्य ते भाडे दिले जाणार आहे.

तर सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाची असलेली रडार यंत्रणा तिवंडेवाडीत उभारली जाणार आहे. तिवंडेवाडीतील स्थानिकांनी रडारसाठी जागा दिली आहे. विमानतळ भागातील ज्या ग्रामस्थांची जागा संपादित केली जाणार आहे, त्यांना रेडिरेकनरप्रमाणे दर देण्यात येणार आहे.

- आतापर्यंत किती काम झाले?

रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण

पहिली ११०० मिटरची धावपट्टी केली २ कि.मी. ची

धावपट्टीची वाढवली उंची; चार्टर फ्लाईट उतरणार

डोमेस्टिक महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे मागितली परवानगी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT