Nilesh Rane Sarkarnama
कोकण

Shivsena MLA : शिंदेंच्या आमदाराला न्यायालयाचा मोठा दिलासा! गोहत्या आंदोलन प्रकरणात निर्दोष मुक्तता! इतर 24 जणही बाहेर पडले

Ratnagiri Cow Slaughter Protest Case : गेल्या वर्षी रत्नागिरी येथे झालेल्या गोहत्या विरोधातील आंदोलन झाले होते. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश असतानाही तो मोर्चा काढण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी नीलेश राणेंसह 450 जणांवर गुन्हा दाखल केला होता.

Aslam Shanedivan

Summary :

  • गतवर्षी रत्नागिरीत झालेल्या गोहत्या आंदोलन प्रकरणात आमदार नीलेश राणे, बाळ माने, सचिन वहाळकर, चंद्रकांत राऊळ यांच्यासह २४ जण निर्दोष सुटले.

  • वासराची मान कापलेली आढळल्याने शहरात संतापाची लाट उसळली होती व आंदोलन भडकले होते.

  • न्यायालयीन निकालामुळे सर्व आरोपींना दिलासा मिळाला असून या निर्णयानंतर चर्चा रंगली आहे.

Ratnagiri News : गेल्या वर्षी रत्नागिरी येथे गोहत्या विरोधातील आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलानत विद्यमान आमदार नीलेश राणे, माजी आमदार बाळ माने, माजी जिल्हा अध्यक्ष सचिन वहाळकर, सकल हिंदू समाजाचे चंद्रकांत राऊळ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. या प्रकरणी पोलिसांनी नीलेश राणेंसह 450 जणांची धरपकड केली होती. तर 24 जणांवर गुन्हा दाखल केला होता. पण आता या प्रकरणात राणेंसह 24 संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल शासनाने खटला मागे घेतल्याने दिला असून सर्व आरोपींना मुक्त केले आहे. या निकालामुळे राणेंना मोठा दिलासा आहे.

गेल्या वर्षी एमआयडीसी परिसरात वासराची मान कापलेल्या स्थितीत आढळली होती. यामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात कोणतीही तातडीची कारवाई न झाल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा पोलिस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात आला होता. या मोर्चाला शेकडोंच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.

त्यानंतर माजी खासदार नीलेश राणे यांनी “आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू राहील,” अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे रत्नागिरीतील मुख्य मार्ग चार तास ठप्प झाला होता. यानंतर या प्रकरणी पोलिसांनी नीलेश राणेंसह 450 जणांची धरपकड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 24 जणांवर गुन्हे दाखल केले होते.

मात्र, राज्य शासनाच्या सर्क्युलरनुसार ज्या आंदोलनांमध्ये मारहाण किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही, अशा गुन्हे मागे घेण्याचे धोरण असल्याने हा खटला सरकारने मागे घेतला आहे. परिणामी न्यायालयाने नीलेश राणेंसह सर्व 24 संशयितांची निर्दोष मुक्तता केली.

जिल्ह्यात लागू होता प्रतिबंधात्मक आदेश

गेल्या वर्षी एमआयडीसी परिसरात वासराची मान कापलेल्या स्थितीत आढळल्याने वातावरण तापले होते. जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर हिंदू संघटनांतर्फे मोर्चा आणि रास्तारोको करण्यात आला. यावेळी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला होता.

मात्र त्यानंतर देखील आमदार नीलेश राणे, माजी आमदार बाळ माने, माजी जिल्हा अध्यक्ष सचिन वहाळकर, सकल हिंदू समाजाचे चंद्रकांत राऊळ यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. शिवाय रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले. त्यामुळे जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता.

FAQs :

प्र.१: गोहत्या आंदोलन प्रकरणात किती आरोपींना निर्दोष मुक्तता मिळाली?
उ: आमदार नीलेश राणेसह एकूण २४ आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

प्र.२: आंदोलन का झाले होते?
उ: रत्नागिरी एमआयडीसी परिसरात वासराची मान कापलेली आढळल्याने संताप उसळला आणि आंदोलन झाले.

प्र.३: निर्दोष मुक्ततेनंतर कोणत्या नेत्यांना दिलासा मिळाला?
उ: आमदार नीलेश राणे, माजी आमदार बाळ माने, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, चंद्रकांत राऊळ आणि इतरांना दिलासा मिळाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT