Uday Samant, nilesh rane
Uday Samant, nilesh rane sarkarnama
कोकण

राणेंचा सुपडा साफ ; उदय सामंतांनी बाजी मारली, सहकार पॅनल विजयी

सरकरानामा ब्युरो

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकालात (Ratnagiri district central co-operative election result) शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पँनलने दणदणीत विजय मिळविला आहे. एकुण २१ जागांपैकी दणदणीत १८ जागा मिळवल्या आहेत.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे अवघ्या कोकणाचं लक्षं लागलं होतं. त्यांचे निकाल आज जाहीर करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर, शिवसेना नेते उदय सामंत (Uday Samant)आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पँनलने (Sahakar panel) वर्चस्व निर्माण केलं आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Ratnagiri district central co-operative election result) निलेश राणे यांच्या पँनलचा सुपडा साफ झाला आहे. एकुण २१ जागांपैकी दणदणीत १८ जागांवर उदय सामंत आणि तानाजी चौरगे समर्थक निवडुण आले आहेत. तर निलेश राणे यांच्या समर्थकांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे कोकणातील आणखी एका प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांना दारूण पराभव झाला आहे.

रत्नागिरी जिल्हा बँकेसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील एकूण 871 मतदारांनी आपला मतदानाचा हक्का बजावला होता. या निवडणुकीत 87.45 टक्के मतदान झाले होते. रत्नागिरी जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागा आहेत. या 21 जागांपैकी 14 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर इतर जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या 7 जागांसाटी एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

साताऱ्यात तणाव

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या होणाऱ्या मतदानामध्ये तणाव पाहायला मिळत आहे. जावली तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे चित्र मतदान केंद्रावर पहायला मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून जावली तालुक्यातील मेढा मतदान केंद्रावर तणाव कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT