Dapoli 70 Country Made Bombs Seized Sarkarnama
कोकण

Dapoli Bombs Recovered : युद्धाची तयारी कोणाविरोधात? कोणावर हल्ल्याचा कट? 70 जिवंत गावठी बॉम्ब जप्त; कोकणात खळबळ!

Ratnagiri Police LCB Seizes 70 Live Country Made Bombs in Dapoli : रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी बेकायदेशीर स्फोटक पदार्थाविरुद्ध केलेल्या कारवाईत दापोली तालुक्यातील युवाकाला अटक केली.

Pradeep Pendhare

Dapoli bomb seizure: रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने बेकायदेशीर स्फोटक पदार्थाविरुद्ध मोठी कारवाई केली. दापोली तालुक्यातील युवकाला अटक करत, त्याच्याकडून 70 जिवंत गावठी बॉम्ब व वाहनासह 2 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. एवढ्या मोठ्याप्रमाणात जिवंत गावठी बाॅम्ब जप्त करण्याची अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ असून, या कारवाईने कोकणात खळबळ उडाली आहे.

प्रकाश राम जगताप (वय 33, रा. शिरसाळे, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेड उपविभागात गस्त घालत होते. खेड–मंडणगड रस्त्यावर मौजे मुरगज इथं सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास पोलिसांना (Police) संशयास्पद हालचाल करणाऱ्या प्रकाश जगताप या युवकाला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून बेकायदेशीररीत्या बाळगलेले 70 जिवंत गावठी बॉम्ब तसेच एक चारचाकी वाहन, असा एकूण 2 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सार्वजनिक सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराबाबत संशयिताविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास दापोली पोलिस ठाणे करत आहेत. ही कारवाई कामगिरी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन हेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत बोरक हे करत आहेत.

स्फोटक कोठून आणले?

एवढ्या मोठ्याप्रमाणात युवकाकडून बेकायदेशीर स्फोटक पदार्थ जप्त केल्याने कोकणात (Kokan) खळबळ उडाली आहे. कोणाविरोधात युद्ध छेडायचे होते? कोणावर हल्ला करण्याचा कट होता? कोणाला बेकायदेशीर स्फोटकं विक्री करायचे होते? हे स्फोटक कोठून आणले? कोणी मदत केली? हे गावठी बाॅम्ब कोठे तयार केले? कोठे कारखाना आहे का? असे एक ना अनेक प्रश्न पडले आहेत.

पोलिसांचे आवाहन

एवढ्या मोठ्याप्रमाणात स्फोटक जप्त करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात येत असून, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात किंवा डायल 112 या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन रत्नागिरी पोलिसदलातर्फे करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT