Ratnagiri District Planning Committee meeting sarkarnama
कोकण

Mahayuti Politics : महायुतीतील नेते एकत्र, पण तटकरे-कदमांमध्ये दुरावा? योगेश कदमांनी भेट टाळल्याने राजकीय चर्चांना उधाण

Yogesh Kadam Avoids Sunil Tatkare : रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर नवा वाद सुरू झाला आहे. महायुतीचे नेते एकत्र एकाच गाडीतून गेले असतानाच मात्र दोन नेत्यांमधील नाराजीमुळे वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Aslam Shanedivan

Ratnagiri Political News : कोकणात पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या वादाची धग आता शेजारी असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात पोहचली आहे. दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही यावरून नाराजी नाट्य समोर आले असून गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात दुरावा दिसला. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे आणि खासदार सुनील तटकरे महायुतीतील हे नेते एकत्र आले होते.

मात्र तटकरे दाखल झाल्यानंतर कदम यांनी त्यांची भेट टाळली. तसेच तटकरे यांच्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. दापोली विधानसभा मतदारसंघातील दोन्ही नेत्यांमधील राजकीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवर आता या घटनेकडे पाहिले जात असून तसे राजकीय महत्त्व दिलं जात आहे.

या बैठकीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे आणि खासदार सुनील तटकरे हे एकाच वाहनातून रवाना झाले. यामुळे महायुतीतील भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते एकाच वाहनातून गेल्याने हा प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान काहीच दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे यांच्यावर निशाना साधला होता. कदम यांनी तटकरे यांच्यावर ताटत खाल्ले त्याच ताटात छेद देण्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना तटकरे यांनी कदमांची अवस्था वाईट झाली असून आपण याची वादाची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT