Ratnagiri Refinery News: रत्नागिरीतील रिफायनरी सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन पेटले आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना राजापूरमध्ये अटक करण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वैभव कोळवणकरांसह त्यांच्या दोन सहकाऱ्यांनाही ताब्यात घेतले असून तिघानांही रत्नागिरीमध्ये ठेवण्यात आले आहे. (movement of Barsu Refinery ignited; 1800 policemen deployed for survey along with CRPF)
दरम्यान, बारसू - सोलगाव रिफायनरीच्या दृष्टीने सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. मात्र या ठिकाणीसर्व्हेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हंटले की, सर्व्हेक्षण झालं म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशीच दिवशी रिफायनरीचं काम सुरू होणार असं काही नाही. तसेच, पोलिसांकडून माध्यमकर्मींना झालेल्या अरेरावी बाबत ही सामंतांनी भाष्य केले आहे.
"माध्यम प्रतिनिधिंनी या गोष्टी कव्हर करताना, जमीनीवरचं वास्तव परिस्थितीसुद्धा दाखवली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. प्रसारमाध्यमांना सोबत घेऊनच आम्हाला पुढे जायचे आहे. आंदोलकांना बाबत संवाध साधून, लोकशाहीच्या पध्दतीने समजूत घालून, तो आम्ही दूर करू शकतो," असे उदय सामंत म्हणाले.
"आज रिफायनरीबाबत सर्वेक्षण झालं, याचा अर्थ म्हणजे प्रकल्प दोन दिवसांत सुरू होईल असे नाही. आधी पूर्ण तपासणी केली जाईल, त्यानंतरच या ठिकाणी प्रकल्प होणार की नाही ते ठरणार आहे. आम्ही देखील जनतेला वेळोवेळी हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत," असे सामंत यांनी म्हंटले आहे. सामंत हे माध्यमांशी संवाद साधत होते.
"सध्या जोपर्यंत याबाबतची चाचणी अंतिमपणे होत नाही. तोपर्यंत आपल्याला या प्रकल्पाबद्दल काहीही सांगता येत नाही. काही जण म्हणतात की, आंदोलकांची दडपशाही केली जात आहे. मात्र पूर्वीपासून पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी सामंजस्यांची भूमिका केली आहे," असे सामंत म्हणाले. (Latest Maharashtra News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.