Narayan Rane sarkarnama
कोकण

Narayan Rane : घरच्या मैदानावर तीन पराभव, नारायण राणे हिशेब चुकता करणार!

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Narayan Rane Vs Vinayak Raut : नारायण राणेंनी मु्ंबईच्या पोटनिवडणुकीतून विजय मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण तेथे देखील त्यांना पराभवाचेच तोंड पाहावे लागले.

Roshan More

Lok Sabha Election : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुलूख मैदानी तोफ ते काँग्रेस नेते असा प्रवास करून भाजपमध्ये विसावलेले नारायण राणेंसाठी निकालाचा दिवस चिंतेचा आहे. नारायण राणेंच्या राजकीय कारकि‍र्दीचे सर्वात वाईट वर्ष 2014 वर्ष ठरले. त्या वर्षभरात कोकणच्या आपल्या घरच्याच मैदानावर लोकसभा निवडणुकीत मुलगा निलेश राणेचा पराभव आणि विधानसभेत स्वतः नारायण राणे पराभूत झाले.

नारायण राणे Narayan Rane यांना हा पराभव खूपच जिव्हारी लागला होता. पुन्हा मु्ंबईच्या पोटनिवडणुकीतून विजय मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण तेथे देखील त्यांना पराभवाचेच तोंड पाहावे लागले. राणे काँग्रेसमध्ये असताना हे तीनही पराभव त्यांचे नंबर एकच शत्रू उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व असलेल्या शिवसेनेकडून झाले.

यंदा भाजपकडून नारायण राणे हिशेब चुकता करण्यासाठी मैदानात आहेत. एक्झिट पोलमध्ये नारायण राणे आघाडीवर दाखवत आहेत. मात्र, निकाल हाती येईपर्यंत राणेंची धाकधुक वाढणार आहे. त्यांचे कट्टर विरोधक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून खासदार विनायत राऊत येथे मैदानात आहेत.

त्यामुळे कुडाळमध्ये विधानसभेत झालेला पराभव आणि विनायक राऊतांनी निलेश राणेंना 2014 मध्ये केलेल्या पराभवाचा वचपा राणे या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दाखवून देतात का? याकडे कोकणी माणसाचे लक्ष लागले आहे.

कोकणात ठाकरेंना सहानुभूती आहे. कोकणी माणूस सुरुवातीपासून ठाकरेंच्या मागे ठामपणे उभा राहिला आहे. त्यामुळे राणेंना पुन्हा एकदा त्यांच्या घरात पराभवाची धूळ ठाकरेंचा शिलेदार दोन टर्मचे खासदार विनायक राऊत चारणार का? यावर देखील शिवसेनेचे (ठाकरे गट) भवितव्य अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT