Sunil Tatkare Sarkarnama
कोकण

NCP Politics : तटकरेंच्या मेव्हण्याला राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी : रत्नागिरी जिल्हा परिषदेत करणार पक्षाचे नेतृत्व

ajay birwatkar appointed party whip and group leader : कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पाच सदस्य निवडून आले आहेत.

Aslam Shanedivan

  1. रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

  2. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सदस्यांच्या बैठकीत बिरवटकर यांची पक्षप्रतोद आणि गटनेतेपदी एकमताने निवड झाली.

  3. खेड तालुक्यातील भडगाव गटातून निवडून आलेल्या बिरवटकर यांच्यावर आता पक्ष संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ratnagiri zilla parishad News : रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांची महत्त्वाची बैठक झाली असून, यामध्ये खेड तालुक्यातील भडगाव गटाचे नवनिर्वाचित सदस्य अजय बिरवटकर यांची पक्षप्रतोद तथा गटनेतेपदी एकमताने निवड केली आहे.

अजय बिरवटकर हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे मेहुणे आहेत. मात्र, केवळ नातेसंबंधांमुळेच नव्हे, तर त्यांच्या राजकीय कामगिरीमुळे ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद गटात त्यांनी शिंदे शिवसेनेच्या तगड्या उमेदवाराचा पराभव करून विजय संपादन केला आहे.

कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भागात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याने त्यांचे पक्षात वजन वाढले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) खेड, दापोली आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवली होती. या त्रिकोणी आणि चौरंगी लढतीत पक्षाने दमदार कामगिरी करत ५ जागांवर विजय मिळविला आहे. या विजयामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तासमीकरणात अजित पवार गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

राज्यात महायुतीचे (भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी) सरकार असले, तरी रत्नागिरी जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे संकेत मिळत आहेत. सध्या तरी गटनेते निवडीद्वारे पक्षाने आपली संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला आहे.

माझ्यावर पक्षाने टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. रत्नागिरी जिल्हा परिषदेतील आमच्या पाचही सदस्यांच्या या विजयाचे संपूर्ण श्रेय आम्ही सन्माननीय अजित पवार यांच्या नेतृत्वाला समर्पित करतो. आम्ही सर्व सदस्य एकसंध राहून जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत.
- अजय बिरवटकर, गटनेते

FAQs :

1. रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या काय घडामोडी सुरू आहेत?
निवडणूक निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

2. अजय बिरवटकर यांची कोणत्या पदावर निवड झाली?
त्यांची पक्षप्रतोद आणि गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

3. अजय बिरवटकर कोणत्या गटातून निवडून आले आहेत?
ते खेड तालुक्यातील भडगाव गटातून निवडून आले आहेत.

4. ही बैठक कोणत्या पक्षाची होती?
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सदस्यांची ही बैठक होती.

5. पुढील टप्पा काय असू शकतो?
सत्तास्थापनेबाबत पुढील राजकीय हालचाली आणि चर्चांना वेग येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT