Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे बंधू उद्योजक सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. सदानंद कदमांची 'ईडी'ने सुमारे चार तास चौकशी केली. त्यानंतरच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जिल्ह्यातील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकाम आणि संशयास्पद खरेदी-विक्री प्रकरण राज्यात अनेक दिवसांपासून गाजत आहे. भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सदानंद कदम (Sadanand Kadam) हे अनिल परब (Anil Parab) यांचे व्यावसायिक पार्टनर आहेत. 'ईडी'ने त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
साई रिसॉर्ट बांधकाम, जमीन हस्तांतरण प्रकरणी अनिल परबांवर आरोप केला जात आहे. मात्र, माझा या रिसॉर्टशी संबंध नाही. जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असे अनिल परबांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आज सकाळी साडेसात वाजता कुडोशी येथे अनिकेत फार्म हाऊस या सदानंद कदम यांच्या निवासस्थानी 'ईडी'चे पथक आले होते. सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन हे पथक मुंबईच्या दिशेने गेले होते.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची खेडमधील सभा यशस्वी करण्यासाठी सदानंद कदम यांचा पुढाकार होता, म्हणूनच सुडबुद्धीने ही कारवाई झाली असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
आता सदानंद कदमांना अटक झाल्यामुळे अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सदानंद कदम यांच्यावर झालेली ही कारवाई ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.