Eknath Shinde and Uddhav Thackeray
Eknath Shinde and Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Eknath Shinde : तेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ; शिंदे ठाकरेंना देणार प्रतिउत्तर?

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज संध्याकाळी (दि.19 मार्च) खेडमध्ये जाहीर सभा आहे. याआधी उद्धव ठाकरे यांची याच ठिकाणी सभा झाली होती. तेव्हा ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती.

आता एकनाथ शिंदे यांचीही त्याच ठिकाणी आणि त्याच मैदानावर जाहीर सभा आहे. त्यामुळे ठाकरेंना शिंदे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची सभाही हाउसफुल होण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करत आहेत. तसेच या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी होईल, असा दावाही करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना शिवसेनेचे नेते (शिंदे गट) रामदास कदम म्हणाले, ''ज्यावेळी शिवसेनेचे वाईट दिवस होते, त्यावेळी मातोश्रीच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा राहिलो. त्यामुळे या सर्व प्रश्नाची उत्तरं देणारी आजची सभा असेल. कोकणात आतापर्यंत झालेल्या सगळ्या सभांचा रेकॉर्ड ब्रेक करणारी ही ऐतिहासिक सभा असेल'', असं कदम म्हणाले.

दरम्यान, तेच ठिकाण आणि तेच मैदान असल्यामुळे शिंदे काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT