Sawantwadi Assembly Election 2024  
कोकण

Sawantwadi Assembly Election 2024 : केसरकरांकडून कोट्यवधीचा निधी - अशोक दळवी

आताची निवडणूक वाईट प्रवृत्ती विरुद्ध कर्तुत्वान कार्यसम्राट, जनसेवक अशीच होत आहे. जनतेने वारंवार नाकारलेले पुन्हा निवडणूक लढवीत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

सावंतवाडी : आताची निवडणूक वाईट प्रवृत्ती विरुद्ध कर्तुत्वान कार्यसम्राट, जनसेवक अशीच होत आहे. जनतेने वारंवार नाकारलेले पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी पाच वर्षांत अडीच हजार कोटींचा निधी मतदारसंघासाठी आणल्याची माहिती जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी दिली.

श्री. दळवी म्हणाले, ‘‘केसरकरांनी पंधरा वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीत पाच वर्षांत अडीच हजार कोटींचा निधी आणला. त्यांच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाच्या समस्या सोडविण्याच्या त्यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये तो कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार केला नाही. त्यांच्या कार्याचा राज्यभर दबदबा आहे. राज्यातील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग घेतला जातो. त्यांना राज्यभर मिळणारा मान व त्यांच्या कर्तृत्वाचा काही जणांना पोटशुळ उठलं आहे. त्यामुळे उठसुट ते टीका करीत आहेत.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली हे जनतेने वारंवार नाकारलेले उमेदवार आहेत. काही माणसे पैशाने मतदारांना विकत घेण्याची स्वप्न रंगवत आहेत. त्यांची स्वप्न ही स्वप्नच राहतील. केसरकरांच्या कार्यालयाचे दरवाजे जनतेसाठी नेहमीच उघडे असतात. या मतदारसंघात केसरकरांविरोधात बाहेरची माणसे निवडणूक लढवीत आहे. त्यांना जनता ओळखून आहे. या प्रवृत्तीला मतपेटीतून धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही. तसेच जिल्ह्यातील तिन्ही जगावर महायुतीचे वर्चस्व राहणार आहे.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT