Sawantwadi Assembly Election 2024 rajan teli over aaroda village development  
कोकण

Sawantwadi Assembly Election 2024 : आरोंदा गावाच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध - राजन तेली

गेल्या पंधरा वर्षात आरोंदा गावाचा कोणताही विकास आमदार दीपक केसरकर यांनी केला नाही. मालवणच्या धर्तीवर येणाऱ्या सहा महिन्यांत गावातील लोकांना विश्वात घेऊन या गावाचा कायापालट झालेला दिसेल

सरकारनामा ब्यूरो

सावंतवाडी : गेल्या पंधरा वर्षात आरोंदा गावाचा कोणताही विकास आमदार दीपक केसरकर यांनी केला नाही. मालवणच्या धर्तीवर येणाऱ्या सहा महिन्यांत गावातील लोकांना विश्वात घेऊन या गावाचा कायापालट झालेला दिसेल, असे आश्वासन राजन तेली यांनी आरोंदा येथील बैठकीत दिले.

श्री. तेली यांनी सावंतवाडी तालुक्यातील बांदा, कास, मडूरे, डेगवे, निगडे, तळवणे आदी गावात जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, राघवेंद्र नार्वेकर, रवींद्र म्हापसेकर, नम्रता झारापकर, साधना कळंगुटकर, प्रशांत नाईक, आबा केरकर आदी उपस्थित होते.

आरोंदा गावातील ज्येष्ठ शिवसैनिक बाळा आरोंदेकर यावेळी म्हणाले, ‘‘केसरकर यांनी कार्यकर्त्यांना कोणतेही बळ दिले नाही. आरोंदा गावचा विकास करा, पर्यटनाच्या माध्यमातून निधी द्या, अशी मागणी वारंवार केली. मात्र, केसकर यांनी विकासात्मक असे काहीच केले नाही. त्यामुळे तुम्ही आता पर्यटनाच्या माध्यमातून विकास करा. या निवडणुकीत भरघोस मते देणार आहोत.’’

यावर तेली म्हणाले, ‘‘आरोंदा गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. गावातील लोकांना विश्वासात घेऊनच पर्यटनाच्या माध्यमातून विकास केला जाईल. या निवडणुकीत तुम्ही ठाकरे शिवसेनेला मतदान करा. येणाऱ्या काळात तुमच्या मनातील विकास करण्याचा माझा मानस आहे. याठिकाणी रोजगार नसल्यामुळे गोवा राज्यात युवकांना नोकरीला जावे लागते. दुर्दैवी अपघातात एखाद्याचा मृत्यू होतो. याला रोजगारनिर्मिती करु न शकलेले केसरकर जबाबदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT