Dapoli Sai Resort Sarkarnama
कोकण

Dapoli Sai Resort: दापोलीतल्या साई रिसॉर्टला 'ईडी'ने टाळे ठोकले

Dapoli Sai Resort News: साई रिसॉर्टवर ईडीकडून जप्तीची कारवाई

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri : शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याशी संबंधित दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीची नजर वळली. या रिसॉर्टच्या बांधकामात 'सीआरझेड' कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत रिसॉर्टला सील ठोकले. या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचाही संशय आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत होते.

साई रिसॉर्ट हे परब यांच्या मालकीचे असून त्याचे बांधकाम बेकायदा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर सोमय्या आणि परब यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगली होती. मात्र, सोमय्या यांच्या तक्रारीनंतर या रिसॉर्टचे मालक आपण नसल्याचा खुलासा परब यांनी केला होता. त्यानंतरही या प्रकरणात परबांची कोंडी करण्यासाठी सोमय्या यांनी हातात हातोडा घेऊनच यात्रा काढली होती.

त्यावरून भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) आमने-सामनेही आले होते. यानंतर या साई रिसॉर्टच्या प्रकरणामध्ये इडीची एन्ट्री झाली होती. हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहचलं. या प्रकरणामध्ये अनिल परबांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलेले आहे. तसेच रिसॉर्टच्या बांधकामामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय ईडीला असून हायकोर्टात ईडीने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT