Raigad murder case; Sunil Tatkare sarkarnama
कोकण

Raigad murder case : 'सुनील तटकरे हे रायगडचे आका, मंगेश काळोखेंना राष्ट्रवादीने प्री-प्लॅनिंगने संपवलं...', शिवसेना आमदाराने सांगितल्या हत्येपूर्वीच्या भेटीगाठी

MLA Mahendra Thorve claims Over Khopoli murder case On Sunil Tatkare : खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचा हात असल्याचा आरोप आता केला जातोय.

सरकारनामा ब्युरो

  • खोपोली येथील शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या हत्येबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

  • हत्या करण्याचा कट सुतारवाडी येथे झालेल्या भेटीत आखण्यात आल्याचा दावा करत थोरवेंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • या प्रकरणामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे.

- कैलास म्हामले

Raigad murder case News : नुकताच जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकींचा निकाल लागला आहे. जिल्ह्यात एकीकडे आनंदाचा माहोल असतानाच खोपोलीत शिवसेनेच्या महिला नगरसेवकाच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील राजकीय वाद हत्याकांडापर्यंत पोहोचल्याचं दिसत आहे.

या घटनेनंतर आज एकनाथ शिंदे यांनी दिवंगत मंगेश काळोखे यांच्या परिवाराची खोपोलात जाऊन भेट घेतली. पण त्याआधी शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी या हत्येवरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी, तटकरे यांनी रायगडमध्ये रक्तरंजित राजकारण सुरू केले असून विरोधकांच्या हत्या त्यांच्याच सांगण्यावरून होत आहेत. तेच रायगडचा आका आहेत, असा गंभीर आरोप केला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी दिवंगत काळोखे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासह त्यांच्यावर मकोका लावण्यात यावा अशी मागणी केली होती. यावरून आपण काळोखे कुटुंबीयांच्या मागे ठामपणे उभे असून कोणालाही सोडणार नाही, अशा शब्द त्यांनी दिला आहे.

तर थोरवे म्हणाले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि त्यांच्या गुंडांनी ही हत्या केली आहे.या हत्याकांडाचा प्लॅन तटकरे यांच्याच भेटीत शिजल्याचं दावाही त्यांनी केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आरोपी रविंद्र देवकर पाच दिवसाआधी अलिबाग येथील सरकारी वकिलांना भेटून सुतारवाडीला गेला. तेथे जाऊन त्याने तटकरेंची भेट घेतली. याच भेटीत मंगेश काळोखे यांच्या हत्याचा प्लॅन करण्यात आल्याचा गंभीर आणि खळबळजनक थोरवे यांनी केलाय.

तसेच या हत्येत सुधाकर घारे यांचाही सहभाग असून हा दोघांचा प्री-प्लॅन असल्याचा आरोपही थोरवे यांनी केला असून या प्रकरणातील सुधाकर घारेसह 10 आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा दिला आहे. तसेच याप्रकरणी पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करू, पोलिसांना दोन दिवसांचा अल्टिमेटम आहोत असाही सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

FAQs :

1. मंगेश काळोखे यांची हत्या कधी झाली?
➡️ शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी खोपोली येथे निर्घृण हत्या झाली.

2. या प्रकरणात कोणावर आरोप झाले आहेत?
➡️ रविंद्र देवकर, सुधाकर घारे यांच्यावर आरोप झाले आहेत.

3. महेंद्र थोरवे यांनी काय दावा केला आहे?
➡️ हत्या आधीच नियोजित होती आणि त्यासाठी बैठक झाली होती, असा दावा त्यांनी केला आहे.

4. सध्या पोलीस काय कारवाई करत आहेत?
➡️ काही आरोपी ताब्यात असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

5. पुढे काय आंदोलन होणार आहे?
➡️ सर्व आरोपी अटकेत येईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT