Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam On Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Ramdas Kadam On Thackeray: ''ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून गुळाचा गणपती बसवला...''; शिंदे गटाच्या नेत्याचा खोचक टोला

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : रत्नागिरीतील बारसू प्रकल्पावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण पूर्णत: ढवळून निघालं आहे. यात महाविकास आघाडीच्या ठाकरे गटानं या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. याच धर्तीवर सहा तारखेला बारसूला जाणार असून तेथील लोकांना भेटून बोलणार असल्याचं शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. यावरुन आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरेंवर बोचरी टीका केली.

रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी बारसू प्रकल्पासह उध्दव ठाकरेंच्या महाड येथील सभेवरही टीकेची झोड उठवली. कदम म्हणाले, उद्धव ठाकरे दुतोंडी गांडूळ आहेत. बारसूला प्रकल्प करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र लिहिलं. ही वेळ उद्धव ठाकरेंनीच आणली. याच्यापाठीमागे ठाकरेंचं कटकारस्थान आहे.

बारसूतील वातावरण चिघळवायचं म्हणजे एकनाथ शिंदे(Eknath Shinde) मुख्यमंत्री होण्यासाठी लायक नाहीत, हे दाखवण्यासाठी सूडाचं काम उद्धव ठाकरे दुतोंडी सापासारखं करत आहेत असा हल्लाबोल कदम यांनी केला आहे.

रामदास कदम म्हणाले, सर्वांना विश्वासात घेऊनच महाराष्ट्राचा गाडा पुढं घेऊन जायचा आहे. विरोधी पक्ष म्हणजे आपला दुश्मन आहे, ही उद्धव ठाकरेंची पॉलिसी आहे. कारण, ते सुडाचं राजकारण करत आहेत. उद्धव ठाकरेंनीच बारसूचं नाव सुचवलं आणि तेच ६ तारखेला तिकडं जात आहेत. काय चौपाटी आहे का ती? असा सवालही कदम यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री म्हणून गुळाचा गणपती बसवला...

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून गुळाचा गणपती बसवला. स्वत: सहकार चालवत ५७ टक्के निधी राष्ट्रवादीने घेतला. अजित पवारांनी महाराष्ट्र आणि शिवसेनेशी बेईमानी केली. त्यामुळेच ४० आमदारांना बाहेर पडावं लागलं. माझ्या मुलाला निधी न देता राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना १० कोटी रुपयांचा निधी दिला असा हल्लाबोलही रामदास कदमांनी केला आहे.

उद्धव ठाकरे दुतोंडी गांडूळ....

उद्धव ठाकरे दुतोंडी गांडूळ आहेत. बारसूला प्रकल्प करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र लिहिलं. ही वेळ उद्धव ठाकरेंनीच आणली. याच्यापाठीमागे ठाकरेंचं कटकारस्थान आहे. बारसूतील वातावरण चिघळवायचं म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी लायक नाहीत, हे दाखवण्यासाठी सूडाचं काम उद्धव ठाकरे दुतोंडी गांडूळ आहेत अशी टीकाही रामदास कदम यांनी केली आहे.

उध्दव ठाकरे काय म्हणाले होते?

महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत बोलताना उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले,सध्या महाराष्ट्रात बारसूचा विषय भडकलेला आहे. सहा तारखेला बारसूला जाऊन लोकांना भेटून बोलणार. कसं मला अडवू शकता, तो पाकव्याक्त काश्मीर नाही, बांगलादेश नाही, माझ्या महाराष्ट्रातील रत्नागिरीतील तो भाग आहे.

सहा तारखेला आधी मी बारसूला जाणार आणि नंतर महाडच्या सभेला जाणार. तिकडे माझ्या नावाचं पत्र दाखवलं जातं. हो आम्हीच ही जागा सूचवली होती. त्या पत्रात पोलिसांना घुसवा, अश्रूधूर सोडा, वेळेप्रसंगी गोळ्या चालवा पण रिफायनरी करा असं लिहिलंय का? असा सवालही ठाकरेंनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT