Deepak Kesarkar sarkarnama
कोकण

केसरकर तब्बल महिन्याभरानंतर मतदारसंघात परतणार; शिवसैनिकांच्या भूमिकेकडे लक्ष

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) मंगळवारी सावंतवाडीमध्ये जाणार आहेत

सरकारनामा ब्यूरो

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाची भूमिका मांडणारे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) मतदारसंघात परतणार आहेत. एकनाथ शिंदे यांचे बंड आणि राज्यातील सत्तातंराच्या नाट्यामध्ये केसकर तब्बल महिन्याभरानंतर घरी परतणार आहेत. शिंदे गटात दाखल झाल्यानंतर केसरकर यांच्यावर प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

शिंदे गटाच्या अनेक महत्त्वाच्या भूमिका केसरकर यांनी माध्यमांसमोर मांडल्या आहेत. त्यामुळे केसरकर मंत्री होऊनच येतील असे मतदार संघात बोलले जात होत. मात्र, शिंदे सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी लांबला आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी ४ वाजता केसरकर सावंतवाडीत दाखल होणार आहेत. केसरकर यांच्या स्वागताला शिवसैनिक (Shivsena) कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता आहे. तसेच 15 तारखेला केसरकर सावंतवाडीत जाहीर सभा घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयाशिवाय आमदारांवर कोणतीही कारवाई करु नये, अशी सूचना सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. सरन्यायाधीशांच्या या निर्णयामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदारांना एका प्रकारे दिलासाच मिळाल्याचे केसरकर म्हणाले होते. त्यांनी आज दुपारी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेने दाखल केलेल्या मुद्द्यांना आता काही अर्थ राहिला नाही," असे केसरकर म्हणाले. "जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत निलंबन नाही हे योग्य आहे. कारण सर्व बाजू जाणून घेणे गरजेचे आहे. सुनील प्रभु यांना प्रतोद म्हणून ठेवले हे चुकीचे आहे," असे केसरकरांनी स्पष्ट केले होते.

"शिंदे यांना गटनेतेपदावरुन दूर करण्यासंबंधी सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली होती. ती आता जवळपास निकालात लागली आहे. सेनेच्या याचिकेतल्या मुद्द्यांना आता अर्थ नाही. विधीमंडळाला अनेक दिवस अध्यक्ष नव्हते, ही बाब योग्य नव्हती. आता अध्यक्षांची निवड झाली असून सर्वांना त्यांचे आदेश मानावे लागतील," असेही केसरकर यांनी सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT