Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Sarkarnama
कोकण

शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते माघारी फिरताच व्यापाऱ्यांनी दुकाने पुन्हा उघडली

सरकारनामा ब्यूरो

बदलापूर : बदलापूरमध्ये शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आशीष दामले या तीनही नेत्यांनी आपल्या समर्थकांसह बदलापूर पश्चिम मुख्य बाजारपेठेत फेरफटका मारत, व्यापारी व दुकानदारांना शेतकऱ्यांना पाठिंबा देत आजच्या या बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. या वेळी सगळ्याच दुकानदारांनी व इतर व्यापारी वर्गाने या बंदमध्ये सहभाग घेतला. मात्र, जेव्हा हे नेते माघारी फिरले, त्यावेळी काही दुकानमालकांनी आपल्या दुकानांचे शटर पुन्हा उघडले. (Shiv Sena, NCP's leaders returned, the traders reopened their shops)

दिव्यात शिवसैनिकांनी दुकानदारांना मारहाण करीत दुकाने बंद करण्यास सांगितले. याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, दुकानाचे अर्धे शटर उघडून शिवसैनिकांनी दुकानदारांना मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. शिवसेनेने हा आरोप फेटाळला आहे. त्या व्हिडीओमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते दुकानदाराला बोलून दुकान बंद करताना दिसतात.

साबे गावातील दोन दुकानदारांना त्यांनी मारहाण करीत जबरदस्ती दुकान बंद करण्यास लावल्याचे भाजप दिवा शहर मंडळ अध्यक्ष आदेश भगत, दिवा शिव मंडळ सचिव सचिन भोईर यांनी सांगितले. एखाद्याने दुकान उघडे ठेवले असेल आणि त्याला जर दुकान बंद करण्याची विनंती करण्यात आली तर त्यात चुकीचे काय? व्हिडीओमध्ये कोणीही कोणाला मारहाण करताना दिसत नाही. अफवा पसरवण्याचे काम भाजप करीत आहे, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिले.

कल्याणध्ये रिक्षा अडविल्या

कल्याण ः कल्याणमध्ये रिक्षा सुरू ठेवल्याने संतप्त शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना अर्वाच्य भाषा वापरत रिक्षा बंद करण्याचे फर्मान सोडल्याने तणाव वाढला. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला. रिक्षामध्ये प्रवासी असताना अचानक कोणी दगड मारला तर त्याला जबाबदार कोण, अशी विचारणा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना केली. या वेळी काही संतप्त शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना रिक्षा बंद करण्याचे फर्मान केल्याने तणाव निर्माण झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT